प्रश्न 1. मार्च 2025 मध्ये स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?
उत्तर➣ आसाम
*** Notes -
आसाम राज्य सरकारने महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक उपक्रमांसाठी डेटा अॅक्सेस वाढवण्यासाठी आणि सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतःचा उपग्रह, ASSAMSAT प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर केली आहे.
'ASSAMSAT' उपग्रह IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) आणि ISRO (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) यांच्या सहकार्याने विकसित केला जाईल.
आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.
उद्दिष्टे: सीमा सुरक्षा, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास आणि सामाजिक-आर्थिक क्षमता वाढवणे
प्रश्न 2. भारताचा पहिला कार्यरत बहुउद्देशीय संप्रेषण आणि हवामानशास्त्र उपग्रह कोणता ?
उत्तर➣ इन्सॅट 1ए
*** Notes -
INSAT-1A - 10 एप्रिल 1982
प्रश्न 3. 2025 मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिन साजरा केला ?
उत्तर➣ 66 वा
*** Notes -
महाराष्ट्र राज्य स्थापना - 1 मे 1960
प्रश्न 4. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालमधील लिस्बनच्या महापौरांकडून लिस्बन शहराचा _________ पुरस्कार प्रदान करण्यात आला.(#2025)
उत्तर➣ सिटी कि ऑफ ऑनर
प्रश्न 5. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पत्रकारितेतील 'रामनाथ गोएंका पुरस्कार 2025' कोणाला मिळाला आहे ? (#2025)
उत्तर➣ मृदुलिका झा (आज तक) हिंदी (प्रिंट/डिजिटल)
*** Notes -
"डंकी रूट" संदर्भातील उत्कृष्ट रिपोर्टिंगसाठी रामनाथ गोएंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार 2025 मिळाला.
इंडियन एक्सप्रेस ग्रुपने 2006 मध्ये हा पुरस्कार सुरू केला.
प्रश्न 6. 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर➣ 1 मे
*** Notes -
2025 थीम - Safety and Health of Workers
प्रश्न 7. कोणत्या देशाने 'हिमोफिलिया'साठी मानवांमध्ये प्रथमच जीन थेरपी चाचणी सुरु केली आहे ?
उत्तर➣ भारत
*** Notes -
बेंगळुरूमधील बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिलच्या स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (BRIC-inStem) आणि CMC वेल्लोर यांच्यातील सहकार्यामुळे हिमोफिलियासाठी देशातील पहिली मानवी जीन थेरपी चाचणी यशस्वी झाली आहे
प्रश्न 8. भारतातील 107 वे राष्ट्रीय उद्यान कोणते ? (#2025)
उत्तर➣ सिमिलीपाल (ओडिशा) - 845.70 चौरस किमी
प्रश्न 9. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, 2011-12 ते 2022-23 दरम्यान भारताने सुमारे किती लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले आहे ? (#sep2025)
उत्तर➣ 17.1 कोटी
*** Notes -
According to the World Bank’s Spring 2025 Poverty and Equity Brief
प्रश्न 10. 24 एप्रिल 2020 रोजी कोणत्या मंत्रालयाने 'स्वामित्व' योजना सुरु केली ?
उत्तर➣ पंचायती राज मंत्रालय
*** Notes -
राष्ट्र्रीय पंचायत राज दिन - 24 एप्रिल
Survey of Villages Abadi and Mapping with Improvised Technology in Village Areas (SVAMITVA)
प्रश्न 11. कोणत्या राज्याने 'रेशम सखी' योजना सुरु केली ? (#2025)
उत्तर➣ उत्तरप्रदेश
*** Notes -
पुढील 5 वर्षांत 50,000 महिलांना जोडण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात, 2025-26 पर्यंत 15 जिल्ह्यांतील 7500 महिलांना जोडण्यात येईल.
प्रश्न 12. 'इंडिया स्टील 2025' च्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#2025)
उत्तर➣ मुंबई
*** Notes -
उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
प्रश्न 13. 'Indian Genius: The Meteoric Rise of Indians in America' या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय आहे ?
उत्तर➣ मीनाक्षी अहमद
प्रश्न 14. प्रशासकीय कामकाजासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI चा) वापर करणारा देशातला पहिला जिल्हा कोणता ठरला आहे ?
उत्तर➣ सिंधुदूर्ग
प्रश्न 15. सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)
उत्तर➣ तुहीन कांत पांडे
प्रश्न 16. पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)
उत्तर➣ डॉ. अंजू राठी राणा
प्रश्न 17. दरवर्षी 'टुना दिवस' केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर➣ 2 मे
*** Notes -
सुरुवात - 2017
प्रश्न 18. GI टॅग प्राप्त 'अमलसाडी चिकू' कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? (#2025)
उत्तर➣ गुजरात
प्रश्न 19. दुसऱ्या 'आशियाई योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप'चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#2025)
उत्तर➣ नवी दिल्ली
*** Notes -
भारताने 83 सुवर्णपदके जिंकली.
प्रश्न 20. 'सॅटेलाइट बस ॲज अ सर्विस (SBaaS)' उपक्रम कोणी सुरु केला आहे ?
उत्तर➣ इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE)
*** Notes -
या उपक्रमाचा उद्देश भारतातील खाजगी कंपन्यांना सॅटेलाइट-बस प्लॅटफॉर्म डिझाइन आणि विकसित करण्यास प्रोत्साहित करणे आहे.
प्रश्न 21. SIPRI अहवालानुसार 2024 मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे ?(#2024)
उत्तर➣ पाचव्या
*** Notes -
SIPRI - STOCKHOLM INTERNATIONAL PEACE RESEARCH INSTITUTE
या अहवालानुसार, 2024 मध्ये संपूर्ण जगाने संरक्षणावर सुमारे 2.72 ट्रिलियन डॉलर्स इतका खर्च केला आहे, जो 2023 च्या तुलनेत 9.4 टक्क्यांनी अधिक आहे.
अनुक्रमे 5 देश - संयुक्त राष्ट्र अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, भारत.
प्रश्न 22. कोणत्या राज्यात ७ वी 'युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025' आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर➣ ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश)
प्रश्न 23. 'आशियाई क्रीडा स्पर्धा 2026' कोठे नियोजित आहेत ?
उत्तर➣ नागोया (जपान).
*** Notes -
मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) ला प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
📚 आणखी वाचा :
👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3
No comments:
Post a Comment