प्रश्न 1. 'नॅशनल ई - विधान ऍप्लिकेशन (NeVA)' लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर➣ नागालँड(#2022)
*** Notes -
"नॅशनल ई-विधान एप्लिकेशन (NeVA)" हे 'एक राष्ट्र - एक एप्लिकेशन' या संकल्पनेवर विकसित करण्यात आले आहे .
डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत , भारत सरकारने देशातील सर्व विधानसभांना कागदविरहित स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी आणि त्यांना एकाच व्यासपीठावर एकत्रित करण्यासाठी केंद्र प्रायोजित 'राष्ट्रीय ई-विधान अर्ज' योजना सुरू केली आहे.
प्रश्न 2. हरित कर्जरोखे(bonds) जारी करणारी पहिली महानगरपालिका कोणती ?
उत्तर➣ पिंपरी चिंचवड
*** Notes -
पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हरित कर्जरोखे ‘इश्यू’ केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
प्रश्न 3. अरण्यऋषी म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर➣ मारुती चितमपल्ली
*** Notes -
मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रश्न 4. अलीकडे कोणत्या शहराला बिबट्यांची राजधानी म्हणून ओळख मिळाली आहे ? (#2025)
उत्तर➣ बेंगळुरू
प्रश्न 5. 'सिफत कौर समरा' हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर➣ नेमबाजी
*** Notes -
नुकतीच कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे झालेल्या १६ व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ऑलिंपियन सिफत कौर समराने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. (#ऑगस्ट 2025)
प्रश्न 6. अर्जुन इरिगेसी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर➣ बुद्धिबळ
प्रश्न 7. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 अनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
उत्तर➣ 131
*** Notes -
भारत Gender Parity Score 2025 - 64.1% आहे
2025 पहिल्या स्थानी - आइसलँड(16 वर्षांपासून पहिल्या स्थानी)
2025 नुसार बांग्लादेश - 24, भूतान - 119, नेपाळ - 125, श्रीलंका - 130, मालदीव -138 आणि पाकिस्तान -148
2025 यावर्षीची हि 19 वी आवृत्ती आहे.
2024 भारत - 129 वा क्रमांक
अहवाल 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' तर्फे जाहीर करण्यात येतो.
चार प्रमुख आयामांमध्ये लिंग समानतेची सद्यस्थिती आणि उत्क्रांती यांचे बेंचमार्क करण्यासाठी २००६ मध्ये प्रथम हे सादर करण्यात आले :
1.आर्थिक सहभाग आणि संधी
2.शैक्षणिक उपलब्धी
3.आरोग्य आणि जगणे
4.राजकीय सक्षमीकरण
हा निर्देशांक ० आणि १ च्या दरम्यान आहे, १ हा पूर्ण समता दर्शवितो. लिंग अंतर म्हणजे पूर्ण समतेपासूनचे अंतर.
प्रश्न 8. पुरुष IPL 2025 चा विजेता संघ कोणता ?
उत्तर➣ रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू(कॅ. रजत पाटीदार) वि. (पंजाब किंग्स)
*** Notes -
IPL 2025 Season 18
IPL 2025 - (759) धावांसह सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून साई सुदर्शनने ऑरेंज कॅप जिंकली आणि सर्वाधिक विकेट्स (25) घेतल्याबद्दल प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅप जिंकली.
मुंबई इंडियन्स - 5, चेन्नई सुपरकिंगस - 5, कोलकाता नाईट रायडर्स - 3, सनराइजर्स हैदराबाद - 1, डेक्कन चार्जर्स - 1, राजस्थान रॉयल्स - 1, गुजरात टाइटन्स - 1, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू - 1
प्रश्न 9. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?(#sep2025)
उत्तर➣ सी. पी. राधाकृष्णन(12 सप्टेंबर 2015 पासून)
*** Notes -
पूर्ण नाव - चंद्रपुरम पोन्नूसामी राधाकृष्णन
उपराष्ट्रपती पदी निवडून येण्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
14 वे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड़(11 ऑगस्ट 2022 - 21 जुलै 2025)
.13 वे उपराष्ट्रपती - व्यंकय्या नायडू(11 ऑगस्ट 2017 - 11 ऑगस्ट 2022)
प्रश्न 10. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा 'संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025' कोणाला देण्यात आला आहे ?
उत्तर➣ पद्मश्री अशोक सराफ
*** Notes -
2024 - डॉ. शरद भुताडिया
प्रश्न 11. दरवर्षी 'मराठवाडा मुक्ति संग्राम दिन' केव्हा साजरा करण्यात येतो ?
उत्तर➣ 17 सप्टेंबर
प्रश्न 12. मालदीवच्या कितव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्यात आले होते ? (26 जुलै 2025)
उत्तर➣ 60 व्या
*** Notes -
मालदीवने 26 जुलै 1965 रोजी ब्रिटीश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले.
मालदीवचे राष्ट्रपती - डॉ. मोहम्मद मुइझ्झू
रिपब्लिक स्क्वेअरवर स्वातंत्र्य दिनाच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय पंतप्रधानांनी मालदीवच्या स्वातंत्र्य दिन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची पहिलीच वेळ होती.
अधिक माहितीसाठी 👉 Source Link
प्रश्न 13. 'मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025' हा किताब कोणी जिंकला आहे ?
उत्तर➣ विधू इशिका
प्रश्न 14. 'निसार' उपग्रह हि ______ आणि इस्रो यांची संयुक्त मोहीम आहे.
उत्तर➣ नासा
प्रश्न 15. ग्लोबल फायनान्सने 2025 साठी 'जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक' म्हणून कोणती बँक निवडली आहे ?
उत्तर➣ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI).
*** Notes -
ग्लोबल फायनान्स (2025)अनुसार - जगातील सर्वोत्तम बँक - सोसायटी जनरल,
जगातील सर्वोत्तम कॉर्पोरेट बँक - बीबीव्हीए,
जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक - स्टेट बँक ऑफ इंडिया,
जगातील सर्वोत्तम उदयोन्मुख बाजारपेठ बँक - जेपी मॉर्गन,
जगातील सर्वोत्तम फ्रंटियर मार्केट बँक - सोसायटी जनरल आणि
जगातील सर्वोत्तम सब-कस्टोडियन बँक - सीआयबीसी मेलॉन.
अधिक माहितीसाठी 👉 Source Link
प्रश्न 16. 43वा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025' कोणाला मिळाला आहे ? (aug 2025)
उत्तर➣ नितीन गडकरी
*** Notes -
पुरस्काराची सुरुवात - 1 ऑगस्ट 1983
हा पुरस्कार पुण्यातल्या लो. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येतो.
पहिले मानकरी - गोदावरी परूळेकर
2024 (42वा) - सुधा मूर्ती
2023 (41वा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रश्न 17. कोणत्या देशाने मतदानाचे वय 18 वरून 16 करण्याचा निर्णय घेतला आहे ? (#2025)
उत्तर➣ ब्रिटन
प्रश्न 18. 'ग्रीन हायड्रोजन समिट 2025' कोठे आयोजित करण्यात आले होते ?
उत्तर➣ अमरावती (आंध्रप्रदेश)
*** Notes -
राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन: राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हे भारताचे हरित हायड्रोजन वाढवण्याचे प्रमुख धोरण आहे , ज्याचे लक्ष्य २०३० पर्यंत ५ दशलक्ष टन वार्षिक हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता स्थापित करणे आहे.
या मोहिमेचा पहिला टप्पा २०२२-२३ ते २०२५-२६ पर्यंत असेल , त्यानंतर दुसरा टप्पा २०२६-२७ ते २०२९-३० पर्यंत असेल .
प्रश्न 19. 2025 ची 'जागतिक हायड्रोजन शिखर परिषद' कुठे भरविण्यात आली होती ? (#2025)
उत्तर➣ रॉटरडॅम (नेदरलँड)
प्रश्न 20. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?
उत्तर➣ 2026
*** Notes -
अधिक माहितीसाठी 👉 आंतरराष्ट्रीय वर्षे
प्रश्न 21. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2025 पासून दरवर्षी 21 मार्च हा दिवस काय साजरा करण्याचे ठरविले आहे ?
उत्तर➣ जागतिक हिमनदी दिन (World Day for Glaciers)
*** Notes -
अधिक माहितीसाठी 👉 Source Link
प्रश्न 22. 'आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस' कधी साजरा केला जातो ?
उत्तर➣ 30 जून (International Asteroid Day)
*** Notes -
डिसेंबर 2016 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 30 जून हा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला
📚 आणखी वाचा :
👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3
No comments:
Post a Comment