SET/NET Marathi Paper 20
प्रश्न 1. 'या देशाचे मूळ रहिवासी हे क्षत्रिय आहेत' असे आपल्या लिखाणातून वारंवार मांडणारे लेखक कोण ? (SET 2021)
अ) रामचंद्रपंत अमात्य
ब) महात्मा फुले
क) कृष्णाजी अनंत सभासद
ड) प्रभाकर
- ब) महात्मा फुले
प्रश्न 2. 'प्रवासवर्णना'चे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे ? (SET 2021)
अ) तपशीलवार स्थलवर्णन
ब) लेखकाचे स्थलसंबद्ध अनुभव
क) नाट्यमय प्रसंग
ड) लालित्यपूर्ण शैली
- ब) लेखकाचे स्थलसंबद्ध अनुभव
प्रश्न 3. मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्रकार असा कोणाचा उल्लेख केला जातो ? (SET 2021)
अ) एकनाथ
ब) भास्करभट बोरीकर
क) म्हाइंभट
ड) संत नामदेव
- क) म्हाइंभट
प्रश्न 4. गोष्ट (स्टोरी) आणि कथानक (प्लॉट) यांमधील रूपभेद कोणी स्पष्ट केला आहे ? (SET 2021)
अ) इ. एम. फॉर्स्टर
ब) ॲरिस्टॉटल
क) मिखाइल बाख्तिन
ड) झ्याक डेरिडा
- अ) इ. एम. फॉर्स्टर
प्रश्न 5. 'पर्सनल एसे' हि संज्ञा 'लघुनिबंधास' कोणी योजली आहे ? (SET 2021)
अ) ऑस्टिन वॉरेन
ब) रेने देकार्त
क) आल्फ्रेड शुत्झ
ड) चार्लस् लॅम्ब
- ड) चार्लस् लॅम्ब
प्रश्न 6. 'गर्भनाटक' या नाट्यांतर्गत क्लुप्तीचा वापर पुढीलपैकी कोणत्या नाटकात केला आहे ? (SET 2021)
अ) अवघ्य
ब) आत्मकथा
क) शांतता ! कोर्ट चालू आहे
ड) बेगम बर्वे
- क) शांतता ! कोर्ट चालू आहे
प्रश्न 7. भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्रा'त 'नाटका'शी संबंधित किती रूपकप्रकार सांगितले आहेत ? (SET 2021)
अ) दहा
ब) आठ
क) पाच
ड) बारा
- अ) दहा
प्रश्न 8. 'कथे'तील ना. सी. फडकेप्रणीत तंत्रवादाला नकार देणारे कथाकार कोण होते ? (SET 2021)
अ) वि. वि. बोकील
ब) गो. ना. दातार
क) य. गो. जोशी
ड) वि. सी. गुर्जर
- क) य. गो. जोशी
प्रश्न 9. "सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करी आता ।
ऐसे करी अखंडीत । शुद्ध नेम शुद्ध व्रत ।"
- या अभंगाचा कर्ता कोण ? (SET 2019)
अ) संत तुकाराम
ब) संत एकनाथ
क) महदंबा
ड) संत जनाबाई
- ड) संत जनाबाई
प्रश्न 10. 'पथनाट्या'च्या सादरीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ? (SET 2019)
अ) संदेशप्रवणता
ब) अभिनयक्षमता
क) सांगीतिकता
ड) लवचिकता
- अ) संदेशप्रवणता
प्रश्न 11. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे कोणते वैशिष्ट्य 'रोजनिशी'तुन प्रकर्षाने प्रकटते ? (SET 2019)
अ) व्यासंग
ब) बहिर्मुखता
क) चिंतनशीलता
ड) समाजाभिमुखता
- क) चिंतनशिलता
प्रश्न 12. 'लिरिक इज मेटॅफर एक्स्टेंडेड' हा शब्दप्रयोग भावकवितेच्या संदर्भात कोणी योजला आहे ? (SET 2019)
अ) हर्बर्ट रीड
ब) क्लाइव्ह बेल
क) ॲरिस्टॉटल
ड) सी. डी. लेविस
- अ) हर्बर्ट रीड
प्रश्न 13. 'नाट्यं भिन्नरुचैर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्' हे लक्षण कोणी सांगितले आहे ? (SET 2019)
अ) भरतमुनी
ब) मम्मट
क) भवभूती
ड) कालिदास
- ड) कालिदास
प्रश्न 14. 'नटसम्राट' पाहताना मन भरून आले व डोळे पाणावले' हे विधान कोणत्या समीक्षा पद्धतीचे निदर्शक आहे ? (SET 2019)
अ) रुपवादी
ब) मानसशास्त्रीय
क) आस्वादक
ड) चरित्रात्मक
- क) आस्वादक
प्रश्न 15. 'बचेंगे तो और बी लढेंगे' हा प्रसंग कोणत्या बखरीमधील आहे ? (SET 2019)
अ) भाऊसाहेबांची बखर
ब) महिकावतीची बखर
क) शिंदेशाही बखर
ड) राक्षसतागडीची
- अ) भाऊसाहेबांची बखर
प्रश्न 16. 'मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा' हा कवितासंग्रह कोणाचा आहे ? (SET 2021)
अ) प्रभू राजगडकर
ब) वाल्मिक शेडमाके
क) रा. चिं. जंगले
ड) गीत घोष
- ब) वाल्मिक शेडमाके
प्रश्न 17. पुढीलपैकी कोणते अनियतकालिक होते ? (SET 2021)
अ) आजचा सुधारक
ब) साहित्य
क) विविधा
ड) अमृत
- क) विविधा
प्रश्न 18. वाङमयाकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन, नव्या अर्थान्वयाच्या पद्धती सतत पुढे येत असल्या; तरी वाड्मयेतिहासावर त्याचा परिणाम होण्याचे कारण नसते : (SET 2019)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
- ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
प्रश्न 19. सर्व इतिहास हा समकालीन इतिहासच असतो, ही भूमिका कोणाची ? (SET 2019)
अ) हेगेल
ब) कांट
क) क्रोचे
ड) इ. एच. कार
- क) क्रोचे
प्रश्न 20. साहित्यकृतीला भूतकाळच नसतो. ती वर्तमानकाळात नांदणारी एक सार्वकालिक घटना असते. म्हणून अशाप्रकारच्या भूतकाळात जमा न होणाऱ्या अनन्य साधारण, स्वायत्त वस्तूंचा इतिहास लिहिता येत नाही, अशी विचारसरणी कोणी मांडली ? (SET 2019)
अ) डब्ल्यू. एच. केर
ब) रोमान इनगार्देन
क) वॉल्टर बेंजमिन
ड) डब्ल्यू. बी. येट्स
- अ) डब्ल्यू. एच. केर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 7 👉 SET NET History PYQ 20 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment