SET/NET Marathi Paper 17
प्रश्न 1. अहिराणी बोलीवर कोणत्या भाषेचा प्रभाव अधिक दिसतो ? (SET March 2023)
अ) हिंदी
ब) गुजराती
क) पंजाबी
ड) कन्नड
- ब) गुजराती
प्रश्न 2. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढीलपैकी कोणी मराठीत साहित्यकृती निर्माण केली आहे ? (SET March 2023)
अ) अरुण कोलटकर
ब) कविता महाजन
क) मेघना पेठे
ड) अतुल पेठे
- ब) कविता महाजन
प्रश्न 3. ठाणे येथील मराठी भाषेतील ग्रंथाचे संग्रहालय कोणाचे प्रेरणेने स्थापन झाले ? (SET March 2023)
अ) दादोबा पांडूरंग
ब) न्यायमूर्ती रानडे
क) गव्हर्नर जोनाथन डंकन
ड) वि. ल. भावे
- ड) वि. ल. भावे
प्रश्न 4. मराठी भाषेतील पहिले बुकीश नाटक कोणते ? (SET March 2023)
अ) जयपाळ नाटक
ब) तृतीय रत्न
क) स्वैरसकेशा
ड) थोरले माधवराव पेशवे
- ड) थोरले माधवराव पेशवे
- थोरले माधवराव पेशवे, जयपाळ - विनायक जनार्दन कीर्तने
- तृतीय रत्न - महात्मा ज्योतिबा फुले
- स्वैरसकेशा - रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर
प्रश्न 5. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटकसंस्थेकडून चालविले जाते ? (SET March 2023)
अ) नवाक्षरदर्शन
ब) अक्षर
क) प्रतिष्ठान
ड) अक्षरवाड्मय
- क) प्रतिष्ठान
प्रश्न 6. 'भारतीय साहित्य' हि संज्ञा प्रथम कोणी वापरली ? (SET March 2023)
अ) रवींद्रनाथ ठाकूर यांनी
ब) पाश्चात्य भारतविद्या शास्त्राच्या अभ्यासकांनी
क) सरोजिनी नायडू यांनी
ड) डॉ. नगेंद्र यांनी
- अ) रवींद्रनाथ ठाकूर यांनी
प्रश्न 7. 'सूर्योदय बघायला जमलेली माणसं' हि कोणाची रचना आहे ? (SET 2019)
अ) नामदेव ढसाळ
ब) अरुण कोल्हटकर
क) प्रफुल्ल शिलेदार
ड) भालचंद्र नेमाडे
- क) प्रफुल्ल शिलेदार
प्रश्न 8.'स्पंदकारिका' या ग्रंथाचा कर्ता कोण ? (SET 2019)
अ) उत्पलाचार्य
ब) भट्ट कल्लूचार्य
क) मम्मट
ड) रुद्रट
- ब) भट्ट कल्लूचार्य
प्रश्न 9. पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने रसप्रक्रियेत अनुकरणाला स्थान दिले ? (SET 2019)
अ) श्री शंकुक
ब) भट्ट लोल्लट
क) अभिनवगुप्त
ड) अप्पय्यदीक्षित
- अ) श्री शंकुक
प्रश्न 10. वामनाने कोणती दोन प्रयोजने मांडली ? (SET 2019)
अ) यश व अर्थप्राप्ती
ब) धर्म व अर्थ
क) अशुभनिवारण व कान्तासम्मिततयोपदेश
ड) प्रीती व कीर्ती
- ड) प्रीती व कीर्ती
प्रश्न 11. पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने भक्तीरसाचा पुरस्कार केला ? (SET 2019)
अ) रूपगोस्वामी
ब) जगन्नाथ
क) विश्वनाथ
ड) मम्मट
- अ) रूपगोस्वामी
प्रश्न 12. करुण रसाचा अनुभव सुखदु:खमिश्रित असतो असे कोणाचे मत आहे ? (SET 2019)
अ) गुणचंद्र व रामचंद्र
ब) भरत
क) अभिनवगुप्त
ड) विश्वनाथ
- अ) गुणचंद्र व रामचंद्र
प्रश्न 13. भाषेच्या द्विस्तरीयतेशी संबंधित घटक कोणते ? (SET 2016 P2)
अ) शब्द आणि वाक्य
ब) भाषण आणि लेखन
क) मूलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना
ड) भाषा आणि भाषण
- क) मूलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना
प्रश्न 14. भाषिक वर्णन हि संकल्पना कोणी मांडली आहे ? (SET 2016 P2)
अ) सोस्यूर
ब) ब्लूमफील्ड
क) विटगेन स्टाइन
ड) जोन्स विल्यम
- अ) सोस्यूर
प्रश्न 15. ब - भ या स्वनिमांच्या निश्चितीसाठी पुढील कोणती जोडी उपयोगी आहे ? (SET 2016 P2)
अ) भाजी - बीजी
ब) वळ - बळ
क) आबाळ - आभाळ
ड) बरा - भारा
- क) आबाळ - आभाळ
प्रश्न 16. चौकटी कंस हि खूण काय दर्शविते ? (SET 2016 P2)
अ) स्वनांतरे
ब) पदिम
क) रुपिका
ड) स्वनिम
- अ) स्वनांतरे
प्रश्न 17. तेलंगणमधील आरे मराठी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ? (SET 2016 P2)
अ) सु. बा. कुलकर्णी
ब) श्री. रं. कुलकर्णी
क) विजया चिटणीस
ड) ना. गो. कालेलकर
- ब) श्री. रं. कुलकर्णी
प्रश्न 18. 'हळूहळू' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ? (SET 2016 P2)
अ) तदभव
ब) अभ्यस्त
क) तत्सम
ड) आख्यात
- ब) अभ्यस्त
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 SET NET History PYQ 23 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment