SET/NET Marathi Paper 19

SET/NET Marathi Paper 19


प्रश्न 1. नागदेवाचार्यांच्या  वचनांना काय म्हणतात ? (SET 2018)

अ) सूत्रपाठ

ब) स्मृती

क) श्रुती

ड) वचनामृत







प्रश्न 2. 'ज्ञानदेवांचा अक्षरदेह  म्हणजे 'ज्ञानेश्वरी' आहे.' हे उद्गार कोणाचे आहेत ? (SET 2018)

अ) गुरुदेव रानडे

ब) विनोबा भावे

क) ल. रा. पांगारकर

ड) वि. ल. भावे

  • ब) विनोबा  भावे  







प्रश्न 3. 'रे. बाबा पदमनजी  म्हणजे मराठी - ख्रिस्ती सारस्वताचे जनक होत. त्यांच्या हातून बनलेली मराठी पुस्तके वजा केली तर आज मराठी - ख्रिस्ती वाङमय असून नसल्यासारखे होईल.' हे उदगार कोणाचे आहेत ? (SET 2018)

अ) ना. वा. टिळक

ब) भास्कर दामोदर पाळंदे

क) फादर फ्रान्सिस दिब्रिटो 

ड) विश्वनाथ नारायण मंडलिक

  • अ) ना. वा. टिळक
  • नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक.






प्रश्न 4. मराठी भाषेवर पुढीलपैकी कोणत्या भाषेचा परिणाम झालेला नाही ? (SET 2018)

अ) पोर्तुगीज

ब) तामिळ

क) फारसी

ड) राजस्थानी

  • ड) राजस्थानी






प्रश्न 5. 'वानगी' या कथासंग्रहाचे लेखक कोण ? (SET 2018)

अ) व्यंकटेश माडगूळकर 

ब) श्री. म. माटे

क) ग. ल. ठोकळ

ड) उद्धव शेळके

  • ड) उद्धव शेळके





प्रश्न 6. वासुदेव मुलाटे यांच्या 'विषवृक्षाच्या मुळ्या' या कादंबरीत पुढीलपैकी कोणत्या विषयाचे चित्रण आले आहे ? (SET 2018)

अ) सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार

ब) वनखात्यातील विविध प्रश्न

क) झोपडपट्टीतील जीवनवास्तव  

ड) महानगरांतील कामगारांचे जीवनवास्तव

  • अ) सहकारक्षेत्रातील भ्रष्टाचार 






प्रश्न 7. 'मरणकळा' आणि 'अंगारमाती' या कथा संग्रहांतील कथांतून प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या विषयाचे चित्रण आले आहे ? (SET 2018)

अ) वीट कामगारांचे जीवनवास्तव

ब) महानगरांतील सफाई कामगारांचे जीवनवास्तव

क) शेतकरी आणि शेतीव्यवसायाचे वास्तव 

ड) सुशिक्षित बेकारांचे जीवनवास्तव

  • क) शेतकरी आणि शेतीव्यवसायाचे वास्तव





प्रश्न 8. नामदेवांच्या कवित्वाचा प्रभाव उत्तर भारतातील पुढीलपैकी कोणाच्या काव्यात दिसून येत नाही ? (SET 2017)

अ) तुलसीदास 

ब) मीरा 

क) नरसी मेहता  

ड) कबीर

  • अ) तुलसीदास






प्रश्न 9. "जिथे थांबला दिवस । तिथे थांबलो मी नाही 

कधी उसवले श्वास। तरी विसावलो नाही"

कवितेच्या ह्या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ? (SET 2017)

अ) नामदेव ढसाळ

ब) यशवंत मनोहर

क) अर्जुन डांगळे

ड) ज. वि. पवार

  • ब) यशवंत मनोहर







प्रश्न 10. 'हृदयाला चटका लावते ती लावणी' हि व्याख्या कोणी केली आहे ? (SET 2017)

अ) म. वा. धोंड

ब) गं. ब. ग्रामोपाध्ये

क) अ. ब. कोल्हटकर

ड) य. न. केळकर

  • क) अ. ब. कोल्हटकर (अच्युत बळवंत कोल्हटकर)







प्रश्न 11. चार - पाच हजार वर्षांचा रामायणकाळ ते डॉ. आंबेडकरांचा काळ इतका प्रदीर्घ कालावकाश सामावून घेणारे म. भि. चिटणीस यांचे नाटक कोणते ? (SET 2017)

अ) युगविधान

ब) युगयात्रा

क) कालचक्र 

ड) समाजाचा विराटपुरुष 

  • ब) युगयात्रा 







प्रश्न 12. 'जेव्हा माणूस जागा होतो' या साहित्यकृतीचा मुख्य विषय कोणता ? (SET 2017)

अ) स्त्रीवादी साहित्याची चळवळ

ब) ग्रामीण साहित्याची चळवळ

क) वारली आदिवासींचा जीवनसंघर्ष 

ड) दलित साहित्याची चळवळ

  • क) वारली आदिवासींचा जीवनसंघर्ष







प्रश्न 13. जी. ए. कुलकर्णी यांच्या विषयी 'भोवऱ्यात सापडलेला प्रतिभावंत' हे मत कोणी मांडले ? (SET 2017)

अ) स. शि. भावे

ब) गंगाधर गाडगीळ

क) भालचंद्र नेमाडे

ड) द. भि. कुलकर्णी

  • ब) गंगाधर गाडगीळ 







प्रश्न 14. 'पुढीलपैकी कोणती एक बोली खान्देशीची बोली नाही  ? (SET 2017)

अ) बागलाण अहिराणी

ब) खानदेशी  अहिराणी

क) नंदूरबारी

ड) डांगी

  • ड) डांगी 







प्रश्न 15. बहात्तर, बत्तीस, बेचाळीस, बावीस, ब्याऐंशी या संख्यावाचकांमधील ब-, बे-, बा-, ब्या- या घटकांचा परस्पर संबंध काय आहे ? (SET 2017)

अ) स्वैर विनियोग

ब) पूरक विनियोग

क) वैधर्म्ययुक्त विनियोग 

ड) आशयबोधक

  • ब) पूरक  विनियोग







प्रश्न 16. 'असंलक्ष्यक्रम ध्वनी' कोठे प्रत्ययास येतो ?  (SET 2018 P2)

अ) वाद्यांच्या गजरामध्ये

ब) काव्यास्वादात

क) कलास्वादात

ड) संगीताच्या मैफिलीत

  • ब) काव्यास्वादात







प्रश्न 17. अभिधाव्यापारासाठी आवश्यक असलेला 'संकेत' कशामुळे सिद्ध होतो ? असे वैय्याकरणी मानतात.  (SET 2018 P2)

अ) जाती, गुण, द्रव्य आणि क्रिया या सर्वांमुळे

ब) फक्त जाती या एकाच घटकामुळे

क) अपोहामुळे

ड) केवळ व्यक्तीमुळे

  • अ) जाती, गुण, द्रव्य आणि क्रिया या सर्वांमुळे







प्रश्न 18. पोट बिघडलेले असते तेव्हा कविता वाचण्याकडे लक्ष लागत नाही, यामध्ये कोणते रसविघ्न आढळून येते (SET 2017 P2)

अ) विभाववैकल्य

ब) प्रतीतिवैकल्य

क) निजसुखा दिवीवशिभाव

ड) पूर्वग्रहनिर्धारण







प्रश्न 19. 'साहित्यकृती ही स्वायत्त व स्वयंपूर्ण वस्तू आहे' ही भूमिका कोणत्या समीक्षा पद्धतीस आधारभूत आहे ?   (SET 2017 P2)

अ) जीवनवादी

ब) रुपवादी

क) अस्तित्ववादी

ड) आदिबंधात्मक

  • ब) रुपवादी







प्रश्न 20. 'द आर्किटाइप्स ऑफ लिटरेचर' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत  (SET 2017 P2)

अ) मॉड बॉडकिन

ब) जेम्स फ्रेझर

क) नॉर्थोप फ्राय

ड) सी. जी. युंग

  • अ) नॉर्थोप फ्राय









पुढे>>>>>>            <<<<<<मागे

 

 

 

 

 


ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

No comments:

Post a Comment