SET/NET Marathi Paper 21
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. मौखिक व लिखित साहित्यपरंपरांमध्ये वेगळेपणा आणणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता ? (SET 2023)
अ) अनुभवाचे सार्वत्रिकीकरण
ब) भाषेचा शब्दसंग्रह
क) लेखकाचे व्यक्तिमत्व
ड) रसिकाचे व्यक्तिमत्व
- अ) अनुभवाचे सार्वत्रिकीकरण
प्रश्न 2. 'वहिवाट' या शब्दात किती स्वन आहेत ? (SET 2023)
अ) सात
ब) आठ
क) चार
ड) सहा
- अ) सात
प्रश्न 3. भाषाकुलाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकांच्या मांडणीमुळे पुढे आली ? (SET 2023)
अ) फर्डिनंड द सोस्यूर
ब) विल्यम जोन्स
क) ब्लूमफील्ड
ड) एडवर्ड सपीर
- ब) विल्यम जोन्स
प्रश्न 4. 'गोरक्ष - अमरनाथ संवाद' या नावाने नाथ संप्रदायात ओळखला जाणारा पण नंतर 'विवेकदर्पण' या नावाने प्रसिद्ध झालेला ग्रंथ कुणी संपादित केला आहे ? (SET 2023)
अ) व. दा. कुलकर्णी
ब) व. दि. कुलकर्णी
क) पां. ना. कुलकर्णी
ड) प्र. न. जोशी
प्रश्न 5. तत्कालीन सर्वसाधारण माणसांच्या अभिरुची ध्यानात घेऊन 'पांडवप्रताप' सारखी ग्रंथरचना करणारा कवी कोण ? (SET 2023)
अ) वामन पंडित
ब) मोरोपंत
क) श्रीधर
ड) सिद्धनागेश
- क) श्रीधर
प्रश्न 6. 'जलशाकरिता कविता संग्रह' हे पुस्तक कोणाचे आहे ? (SET 2023)
अ) केशवराव विचारे
ब) रामनाथ चव्हाण
क) हरिभाऊ चव्हाण
ड) रा. ना. चव्हाण
- क) हरिभाऊ चव्हाण
प्रश्न 7. "साहू नका कोणाचा जुलूम
होऊ नका कुणाचे गुलाम
सोडून या रे सारे बदकाम"
हा संदेश कोणी दिला ? (SET 2023)
अ) शिवराम जानबा कांबळे
ब) हरिभाऊ तोरणे
क) गोपाळबाबा वलंगकर
ड) किसन फागूजी बनसोडे
प्रश्न 8. विंदा करंदीकरांच्या सुनीतांना त्यांनी कोणते नाव दिले ? (SET 2023)
अ) अभंग सुनीत
ब) मुक्त सुनीत
क) आततायी सुनीत
ड) विरूपिका
- ब) मुक्त सुनीत
प्रश्न 9. गुजराती आणि तामिळ साहित्यांतील कादंबरीच्या विकासामध्ये ज्यांच्या कादंबऱ्यांच्या भाषांतरांनी मोलाची भर घातली, असे मराठी कादंबरीकार कोण ? (SET 2023)
अ) बाबा पदमनजी
ब) वि. स. खांडेकर
क) हरी नारायण आपटे
ड) विभावरी शिरुरकर
- ब) वि. स. खांडेकर
प्रश्न 10. लग्नविधीतील 'झालू' गीताचा उल्लेख पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीमध्ये आला आहे ? (SET 2020)
अ) जिणं आमुचं
ब) स्मृतिचित्रे
क) मराठी गौळणी
ड) आयदान
- अ) जिणं आमुचं
प्रश्न 11. पुढीलपैकी कोणत्या विचारवंताची रोजनिशी प्रकाशित झाली आहे ? (SET 2020)
अ) महात्मा ज्योतिबा फुले
ब) विठ्ठल रामजी शिंदे
क) कृष्णराव भालेकर
ड) विष्णुबुवा ब्रह्मचारी
- ब) विठ्ठल रामजी शिंदे
प्रश्न 12. तर्कसंगत युक्तिवाद व खंडनमंडन ही कोणत्या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत ? (SET 2020)
अ) वैचारिक निबंध
ब) लघुनिबंध
क) चरित्र
ड) रसग्रहण
- अ) वैचारिक निबंध
प्रश्न 13. विशिष्ट साहित्यकृतीचे सूक्ष्म व काळजीपूर्वक वाचन कोणत्या प्रकारच्या समीक्षेत अभिप्रेत असते ? (SET 2020)
अ) शुद्ध समीक्षा
ब) ऐतिहासिक समीक्षा
क) सैद्धान्तिक समीक्षा
ड) उपयोजित समीक्षा
- ड) उपयोजित समीक्षा
प्रश्न 14. 'आस्वादक समीक्षे'चे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ? (SET 2020)
अ) उत्कट आत्मप्रत्यय
ब) विशिष्ट विचारव्यूह
क) तार्किकता
ड) चिकित्सकता
- अ) उत्कट आत्मप्रत्यय
प्रश्न 15. 'काकू' म्हणजे काय ? (SET 2020)
अ) बोलताना विशिष्ट सुरात बोलण्यामुळे होणारी अर्थनिश्चिता
ब) नातेवाईक स्त्री
क) संस्कृतप्रचुरता
ड) देशी शब्दांचा भरणा
- अ) बोलताना विशिष्ट सुरात बोलण्यामुळे होणारी अर्थनिश्चिता
प्रश्न 16. मध्ययुगीन मराठी वाड्मयाच्या इतिहासाचे व्यवस्थापन करतांना निराळा व्यूह स्वीकारणे आवश्यक ठरते; कारण तत्कालीन संदर्भात 'वाङ्मय' या संज्ञेची कल्पना आणि व्याप्ती आधुनिक काळापेक्षा वेगळी असणार. (SET 2020)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
- अ) संपूर्ण विधान बरोबर
प्रश्न 17. अंशलक्ष्यी (अॅटमिस्ट हिस्टरी) व समग्रलक्ष्यी (ऑरगॅनिक हिस्टरी) या लेखन प्रणालींच्या विशेषांचे अचूक वर्णन कोणी केले आहे ? (SET 2020)
अ) ऑस्टीन वॉरेन
ब) आर. एस. क्रेन
क) सर ल्युईस नेमिअर
ड) एल. सी. नाईटस
- ब) आर. एस. क्रेन
प्रश्न 18. नामदेवें केले स्वप्नामाजी जागें | सवें पांडुरंगें येवोनिया |
सांगितलें काम करावें कवित्व | वाउगें निमित्य बोलों नको |
हे उद्गार कोणाचे आहेत ? (SET 2020)
अ) रामदास
ब) परिसा भागवत
क) तुकाराम
ड) कान्होपात्रा
- क) तुकाराम
प्रश्न 19. 'जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी | मृत्युचीये भेटी जवळी आली' या तुकोबांच्या अभंगावरून त्यांचे आयुर्मान 80 - 81 वर्षांचे असावे, असे वि. का. राजवाडे मानतात. (SET 2020)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
ड) संपूर्ण विधान चूक
- अ) संपूर्ण विधान बरोबर
प्रश्न 20. अल्ला निरंजन दोऊ नाही रे | समज्यत समज्यन हारो |
भाई काहे कू लडते | लडते सो पडते भाई ||
असा उपदेश कोणी केला ? (SET 2020)
अ) रामदास
ब) एकनाथ
क) निळोबा
ड) कल्याणस्वामी
- अ) रामदास
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भाषेच्या उपपत्तीच्या उपपत्ती/सिद्धांत 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 SET NET History PYQ 19 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 2
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment