SET/NET History 20
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. कुतूबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूनंतर त्याचा _________ इल्तुतमिश याची सुलतान म्हणून निवड झाली. (SET 2024)
अ) मुलगा
ब) भाऊ
क) जावई
ड) पुतण्या
प्रश्न 2. सय्यद राजघराण्याचा संस्थापक खिझरा खान (1414 - 21) मूळचा ________ इथला होता. (SET 2024)
अ) दिपालपूर
ब) चंदेरी
क) कारा
ड) मुलतान
अ) संस्कृत आणि तेलुगू
ब) कन्नड आणि तेलुगू
क) फारसी आणि युरोपीय
ड) तेलुगू आणि फारसी
प्रश्न 4. बीबी का मकबराचे बांधकाम कोणी पूर्ण केले ? (SET 2024)
अ) मुअझ्झम
ब) आझम शाह
क) औरंगझेब
ड) काम बक्ष
प्रश्न 5. सतीश चंद्र यांच्या मते, सम्राट जहांगीर व शहाजहाँ यांच्यातील वादाचे मुख्य कारण कोणते होते ? (SET 2024)
अ) एखाद्या सरदाराने अथवा युवराजाने जास्त शक्तिशाली होणे कोणत्याही राज्यकर्त्याला परवडणारे नसते
ब) शहाजहाँ हा जहांगीरचा सावत्र मुलगा होता
क) शहाजहाँ कायमच नूरजहाँकडून पाठींबा मिळवायचा प्रयत्न करत होता
ड) शहाजहाँ स्वभावतः उन्मत होता
प्रश्न 6. सभासद बखरीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे 1680 साली निधन झाले तेव्हा त्यांच्या घोडदळाचे संख्याबळ _______ पागे व ________ शिलेदार इतके होते. (SET 2024)
अ) 45000 व 60000
ब) 40000 व 65000
क) 55000 व 45000
ड) 60000 व 45000
प्रश्न 7. औरंजेबाविरोधातील राणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन कोणत्या समकालीन मराठी कवीने "दिल्ली झाली दिवानी ! दिल्लीशाचे गेले पाणी ! ताराबाई रामराणी ! भद्रलोकी कोपली !!" असे केले होते ? (SET 2024)
अ) होनाजी बाळा
ब) मोरोपंत
क) गोविंद
ड) सगनभाऊ
प्रश्न 8. आग्य्राहून सुटका करवून घेतल्यावर रायगडावर परतत असताना संभाजी राजांसोबत पुढीलपैकी कोण नव्हते ? (SET 2024)
अ) रामचंद्रपंत
ब) काशीपंत
क) विसाजीपंत
ड) कृष्णाजीपंत
प्रश्न 9. 1763 चे राक्षसभुवन युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले ? (SET 2024)
अ) टिपू सुलतान आणि निझाम
ब) संभाजी महाराज आणि औरंगजेब
क) शाहू महाराज आणि निझाम
ड) माधवराव पेशवा आणि निझाम
प्रश्न 10. खालील यादी I व यादी II यामध्ये जोड्या लावा आणि योग्य तो पर्याय निवडा. (SET 2024)
यादी I (इतिहासकार)
(b) सदाशिव आठवले
(c) वि. का. राजवाडे
यादी II (त्यांचे ग्रंथ)
(ii) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(iii) इतिहासाचे तत्वज्ञान
अ) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
ब) (a) - (iii), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (i)
क) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
ड) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (i), (d) - (iv)
प्रश्न 11. रामानुजाचार्य हे कोणत्या धर्मसंप्रदायाशी संबंधित होते ? (SET 2017 P3)
अ) शैव पंथी
ब) वैष्णव पंथी
क) मायावादी
ड) कापालीक संप्रदाय
प्रश्न 12. मीराबाईंचे अध्यात्मिक गुरु कोण होते ? (SET 2017 P3)
अ) तुलसीदास
ब) दादू दयाल
क) कबीर
ड) रोहिदास
प्रश्न 13. नानासाहेब पेशवा यांच्या काळात मुघल दरबारात मराठ्यांचा वकील कोण होता ? (SET 2017 P3)
अ) नारोजी काळे
ब) रघुजी भोसले
क) रघुनाथ राव
ड) महादेवभट हिंगणे
प्रश्न 14. 'यवनराज स्थापनाचार्य' हे बिरुद कोणत्या विजयनगर सम्राटाने धारण केले ? (SET 2017 P3)
अ) हरिहर पहिला
ब) बुक्क पहिला
क) कृष्ण देवराय
ड) रामराय
प्रश्न 15. मध्ययुगात 'कांचनगडची मोहना' म्हणून प्रसिद्ध झालेल्या खालीलपैकी कोणत्या महिलेने बापू गोखले यांच्या विरुद्ध वासोट्याचा किल्ला आठ महिने लढवला ? (SET 2017 P3)
अ) ताई तेलीन
ब) अहिल्याबाई होळकर
क) राणी लक्ष्मीबाई
ड) छ. संभाजींची पत्नी, येसूबाई
प्रश्न 16. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? (SET 2018 P3)
अ) जौनपूर : अताला मशीद
ब) माळवा : जहाज महल
क) अजमेर : कुव्वत अल इस्लाम
ड) गुलबर्गा : जामी मस्जिद
प्रश्न 17. 'मुखाशीफात - ई - अनिया' चा लेखक कोण ? (SET 2018 P3)
अ) अहमद अजीज
ब) सिरहिंदी
क) अबू फझल
ड) अब्दूर कादीर बदायूनी
प्रश्न 18. मोरोक्कोतील प्रवासी इब्न बतूता _________ याच्या दरबारी आठ वर्ष राहिला. (SET 2018 P3)
अ) फिरोझ तुघलक
ब) मुहम्मद - बिन - तुघलक
क) अलाउद्दीन खिलजी
ड) बल्बन
प्रश्न 19. कोणाच्या राज्यकाळात रागदर्पण या अभिजात भारतीय कलाकृतीचे फारसीमध्ये भाषांतर केले गेले ? (SET 2018 P3)
अ) फिरोझ तुघलक
ब) मुहम्मद - बिन - तुघलक
क) अलाउद्दीन खिलजी
ड) अल्तमश
प्रश्न 20. शेख बहाउद्दीन झकारीया हे पुढीलपैकी कोणत्या सिलसीलाचे सदस्य होते ? (SET 2018 P3)
अ) कादरीया
ब) नक्शबंदी
क) सुऱ्हावर्दी
ड) चिश्ती
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment