SET/NET Marathi Paper 2 18
प्रश्न 1. भाषिक वर्तन हि संकल्पना कोणी मांडली ? (SET 2018)
अ) स्कीनर
ब) चाॅम्स्की
क) ग्रिअर्सन
ड) सोस्यूर
- ड) सोस्यूर
प्रश्न 2. 'स्थानपोथी ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? (SET 2018)
अ) बाईदेव बास
ब) महदंबा
क) म्हाइंभट
ड) मुक्ताबाई
- अ) बाईदेव बास
प्रश्न 3. 'जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमच्या चित्ता' हा आक्रोश कोणाचा ? (SET 2018)
अ) सेना न्हावी
ब) चोखामेळा
क) गोरा कुंभार
ड) कर्ममेळा
- ब) चोखामेळा
प्रश्न 4. मराठी आख्यानकाव्याचे उदगाते असे कोणास संबोधले जाते ? (SET 2018)
अ) संत नामदेव
ब) महदंबा
क) संत एकनाथ
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
- क) संत एकनाथ
प्रश्न 5. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना 'बालकवी' हि उपाधी कोणी दिली ? (SET 2018)
अ) राम गणेश गडकरी
ब) ना. वा. टिळक
क) का. र. कीर्तिकर
ड) कवी चंद्रशेखर
प्रश्न 6. 'विकारविलसित' हि साहित्यकृती कोणत्या नाटकाचा अनुवाद आहे ? (SET 2018)
अ) हॅम्लेट
ब) मॅकबेथ
क) ऍज यु लाईक इट
ड) टेम्पेस्ट
- अ) हॅम्लेट
प्रश्न 7. क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात ? (SET 2017)
अ) आख्यात
ब) विभक्ती
क) कृदंत
ड) धातू
- अ) आख्यात
प्रश्न 8. वाग्मयीन महात्मता हि संकल्पना कोणी मांडली आहे ? (SET 2017)
अ) मे. पुं. रेगे
ब) रा. भा. पाटणकर
क) बा. सी. मर्ढेकर
ड) प्रभाकर पाध्ये
- क) बा. सी. मर्ढेकर
प्रश्न 9. मराठीमध्ये 'कथनमीमांसा' हा दीर्घ लेख कोणी लिहिला आहे ? (SET 2017)
अ) म. सु. पाटील
ब) गंगाधर पाटील
क) मिलिंद मालशे
ड) वसंत पाटणकर
- ब) गंगाधर पाटील
प्रश्न 10. कोणत्या वाङमय प्रकारातील ग्रंथाचे अनुवाद मराठीमध्ये सर्वाधिक झालेले आहेत ? (SET 2017)
अ) कथा
ब) कादंबरी
क) कविता
ड) आत्मचरित्र
- ब) कादंबरी
प्रश्न 11. मराठीतील निवडक कादंबऱ्यांचा परामर्श घेणारा नरहर कुरुंदकरांचा ग्रंथ कोणता ? (SET 2017)
अ) रूपवेध
ब) भजन
क) धार आणि काठ
ड) शिवरात्र
- क) धार आणि काठ
प्रश्न 12. 'माझी मराठी भाषा चोखडी । परब्रह्मे फळली मोठी' असा मराठी भाषेचा गौरव कोणी केला ? (SET 2017)
अ) ज्ञानेश्वर
ब) एकनाथ
क) तुकाराम
ड) रामदास
- ब) एकनाथ
प्रश्न 13. 'टपाल' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे ? (SET 2016 P2)
अ) कन्नड
ब) फारसी
क) अरबी
ड) तमिळ
- अ) कन्नड
प्रश्न 14. मराठी हि 'क्रिओलाइज्ड प्राकृत' आहे, असे कोणी म्हटले आहे ? (SET 2016 P2)
अ) ग्रिअर्सन
ब) साउथवर्थ
क) यु. म. पठाण
ड) वि. का. राजवाडे
- ब) साउथवार्थ
प्रश्न 15. चोंभा कवीचे 'उखाहरण' हे काव्य कोणत्या काव्यप्रकारात मोडते ? (SET 2016 P2)
अ) कथाकाव्य
ब) गीतकाव्य
क) गीतिकाव्य
ड) चंपूकाव्य
- अ) कथाकाव्य
प्रश्न 16. 'देशीकार लेणे' हे कोणत्या ग्रंथास उद्देशून म्हटले जाते ? (SET 2016 P2)
अ) साती ग्रंथ
ब) ज्ञानेश्वरी
क) अमृतानुभव
ड) गाथा
- ब) ज्ञानेश्वरी
प्रश्न 17. महिपतीबुवा ताहराबादकर यांनी कोणता साहित्य प्रकार सर्वाधिक योजला आहे ? (SET 2016 P2)
अ) अभंग
ब) स्वयंवर काव्ये
क) समश्लोकी टीका
ड) संत चरित्रे
- ड) संत चरित्रे
प्रश्न 18. गद्य - पद्य मिश्रीत रचनेस काय म्हटले जाते ? (SET 2016 P2)
अ) स्तोत्र
ब) आर्या
क) चंपूकाव्य
ड) आरती
- क) चंपूकाव्य
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 9 👉 SET NET History PYQ 22 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 6
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment