Thursday, February 29, 2024

SET/NET Marathi Paper 23

  

SET/NET Marathi Paper 23

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. रत्नाकर मतकरी यांचे 'आरण्यक' हे नाटक आणि धर्मवीर भारती यांचे 'अंधा युग' हे नाटक यांच्या तुलनेचा आधारतळ कोणता ? (SET 2019)

अ) समान तत्त्वप्रणाली

ब) समान आधारसामग्री

क) समान प्रेरणास्थान

ड) प्रभाव

  • ब) समान आधारसामग्री






  • प्रश्न 2. 'अभंग' या रचना प्रकाराला काही अन्य प्रयोजनासाठी पुढीलपैकी कोणत्या कवीने नवीन रूप दिलेले नाही ? (SET 2019)

    अ) बा. सी. मर्ढेकर

    ब) विंदा करंदीकर

    क) अरुण कोलटकर

    ड) मधुकर केचे

  • ड) मधुकर केचे






  • प्रश्न 3. 'अपौरुषेय वाङमय' हा ग्रंथ कोणाचा आहे ? (SET 2019)

    अ) ना. रा. शेंडे

    ब) अंबूबाई गोखले

    क) कमलाबाई देशपांडे

    ड) सुशिलाबाई नवरे

  • क) कमलाबाई देशपांडे






  • प्रश्न 4. 'हुंकार वेदनेचे' हा कवितासंग्रह कोणाचा आहे ? (SET 2019)

    अ) उषा भालेराव

    ब) ज्योती लांजेवार

    क) उषा अंभोरे

    ड) हिरा बनसोड

  • क) उषा अंभोरे





  • प्रश्न 5. "ना. सी. फडके यांच्या नागरी कथेचे आणि शैलीचे प्रतिबिंब ग. ल. ठोकळ यांच्या कथेत दिसते" 

    - हे विधान कोणाचे ? (SET 2019)

    अ) नागनाथ कोत्तापल्ले

    ब) इंदुमती शेवडे

    क) वासुदेव मुलाटे

    ड) भालचंद्र फडके

  • क) वासुदेव मुलाटे






  • प्रश्न 6. शेतकरी चळवळीत सक्रिय राहून ग्रामीण साहित्य निर्मिती करणारे लेखक कोण ? (SET 2019)

    अ) बी. रघुनाथ

    ब) सदानंद देशमुख

    क) रा. .रं. बोराडे

    ड) भास्कर चंदनशिव

  • ड) भास्कर चंदनशिव




  • प्रश्न 7. संधी विचारात समास विचारापेक्षा कोणता निराळा घटक प्रस्तुत असतो ? (SET 2020)

    अ) अर्थान्वय

    ब) शब्दान्वय

    क) ध्वनिप्रक्रिया

    ड) प्रत्ययलोप

  • क) ध्वनिप्रक्रिया





  • प्रश्न 8. पुढीलपैकी कोणता गट आशयबोधक पदिमांचा आहे ? (SET 2020)

    अ) नदी, देवालय, राजवाडा

    ब) टेबल, झाड, माणूस

    क) अनु, प्रति, बे

    ड) ने, ला, चा

  • ब) टेबल, झाड, माणूस






  • प्रश्न 9. 'मॅकबेथ' या शेक्सपिअरच्या नाटकांचा मराठीत अनुवाद कोणी केला ? (SET 2020)

    अ) राम गणेश गडकरी

    ब) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

    क) गोविंद बल्लाळ देवल

    ड) वि. वा. शिरवाडकर

  • ड) वि. वा. शिरवाडकर






  • प्रश्न 10. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीवर दिसून येतो ? (SET 2020)

    अ) मर्ढेकरांची कविता

    ब) वि. वा. शिरवाडकर यांची कादंबरी 'वैष्णव'

    क) पु. शि. रेगे यांची कविता

    ड) बाबुराव बागुल यांची लघुकादंबरी 'सूड'

  • ब) वि. वा. शिरवाडकर यांची कादंबरी 'वैष्णव'






  • प्रश्न 11. लोकसाहित्यविषयक अभ्यासातील 'भारतमूलक' सिद्धान्त कोणी मांडला ? (SET 2020)

    अ) जेम्स फॅरेर

    ब) ज्युलियस क्रोन

    क) ए. बी. टायलर

    ड) थिओडोर बेनफे

  • ड) थिओडोर बेनफे






  • प्रश्न 12. लोक सांस्कृतिक दृष्टीकोणातून दैवतकथांचा अभ्यास करणारा मराठीतील अभ्यासक कोण ? (SET 2020)

    अ) ग. ह. खरे

    ब) रा. चिं. ढेरे

    क) द. वा. पोतदार

    ड) वि. का. राजवाडे

  • ब) रा. चिं. ढेरे (रामचंद्र चिन्तामण ढेरे)






  • प्रश्न 13. 'दोन क्रांतिवीर' हे पुस्तक कोणी लिहिले आहे (SET 2019)

    अ) व्यंकटेश आत्राम

    ब) एकनाथ साळवे

    क) माधव सरकुंडे

    ड) गोविंद गारे

  • अ) व्यंकटेश आत्राम






  • प्रश्न 14. दुसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले (SET 2019)

    अ) यवतमाळ

    ब) वणी

    क) चंद्रपूर

    ड) भद्रावती

  • ब) वणी






  • प्रश्न 15. 'केसाळ काळंभोर पिल्लू', 'शामा' आणि 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या साहित्य कृतीसंबंधी निर्माण झालेल्या वादळामागील समान कारण कोणते ? (SET 2019)

    अ) दुर्बोधता

    ब) श्लील - अश्लीलते संबंधीची भूमिका

    क) वेगवेगळ्या संघटनांचा विरोधी दृष्टिकोन

    ड) तत्कालीन शासनाची भूमिका

  • ब) श्लील - अश्लीलते संबंधीची भूमिका

  • केसाळ काळंभोर पिल्लू - दिलीप पुरुषोत्तम चित्रे
  • श्यामा - चंद्रकांत काकोडकर
  • निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी - हनुमंत मोरेश्वर मराठे






  • प्रश्न 16. 'राष्ट्रवादाचे स्वच्छंदतावादी स्वरूप आणि वाङ्मयेतिहासातील आधुनिक प्रवृत्ती यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला' हे मत कुणाचे ? (SET 2019)

    अ) रॉय पास्कल

    ब) एम. एस. प्रावर

    क) रेने वेलेक

    ड) वसंत बापट

  • क) रेने वेलेक






  • प्रश्न 17. 'मिलटॉनिक सॉनेट' मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते ? (SET 2019)

    अ) दहा आणि चार

    ब) आठ आणि सहा

    क) बारा आणि दोन

    ड) नऊ आणि पाच

  • क) बारा आणि दोन






  • प्रश्न 18. लोककथांचा तौलनिक अभ्यास करून त्याची सूची तयार करणारा फिनलँडचा अभ्यास कोण ?  (SET 2019)

    अ) जेम्स फॅरेर

    ब) सी. एस. बर्न

    क) अँटी अर्ने

    ड) फँज बोआस

  • क) अँटी अर्ने







  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 


    ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | 

    No comments:

    Post a Comment