Wednesday, February 28, 2024

SET/NET Marathi Paper 22

 

SET/NET Marathi Paper 22

Share करायला विसरू नका.......................


प्रश्न 1. भाषिक संज्ञापनातील पुढीलपैकी कोणते घटक कमी महत्वाचे आहेत ? (SET 2018)

अ) मानवी मुखातील अवयव

ब) स्वनरचनांची निर्मिती

क) स्वनांचा हवेतून होणारा संचार

ड) परिसरातील गोंगाट

  • ड) परिसरातील गोंगाट







प्रश्न 2. महानुभाव संप्रदायाचा उदय महाराष्ट्रात झाला पण त्याचा प्रसार आणि प्रचार काबुल-कंदाहरापर्यंत झालेला होता:  (SET 2018)

अ) पूर्वार्ध बरोबर

ब) उत्तरार्ध बरोबर

क) संपूर्ण विधान चूक

ड) संपूर्ण विधान बरोबर

  • ड) संपूर्ण विधान बरोबर







प्रश्न 3. 'पोवाडा हे केवळ श्राव्य नव्हे: ते दृश्यकाव्यही आहे. पोवाडा हे एकप्रकारचे नाटक आहे. त्यात अनेक पात्रे असतात. मुख्यतः शाहीर व त्याचा साथीदार हे दोघे पोवाड्यातील व्यक्तींच्या सोंगाची बतावणी करतात.' असे पोवाड्यासंबंधी विवेचन कोणी केले आहे ? (SET 2018)


अ) य. न. केळकर

ब) शाळीग्राम

क) श्री. व्य. केतकर

ड) वि. का. राजवाडे

  • ड) वि. का. राजवाडे







प्रश्न 4. 'वैखरी भाषा आणि भाषाव्यवहार' हा ग्रंथ कोणी लिहिला ? (SET 2018)

अ) न. चिं. केळकर

ब) अशोक केळकर

क) रमेश धोंगडे

ड) य. न. केळकर

  • ब) अशोक केळकर







प्रश्न 5. मंगेश पाडगावकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकांचे मुळाबरहुकूम अनुवाद केले आहेत ? (SET 2018)

अ) द टेम्पेस्ट, ज्युलियस सीझर आणि रोमिओ अँड ज्युलिएट

ब) हॅम्लेट, किंग लिअर आणि मॅकबेथ

क) मिड्समर नाइट्स ड्रीम, ऑथेल्लो आणि द टेम्पेस्ट 

ड) मर्चंट ऑफ व्हेनिस, रोमिओ अँड ज्युलिएट आणि द टेम्पेस्ट






प्रश्न 6. पुढीलपैकी भाषेचे सर्वात महत्वाचे रूप कोणते ? (SET 2017)

अ) वाचणे

ब) ऐकणे

क) बोलणे

ड) लिहिणे

  • क) बोलणे







प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या एका चिन्हाने दिग्दर्शित होणारा ध्वनी मराठी भाषेत वापरत नाहीत ? (SET 2017)

अ) ॠ

ब) ॡ

क) ञ

ड) ङ् 

  • ब) ॡ






प्रश्न 8. पुढील शब्दांमधला कोणता शब्द लेखननियमांनुसार अचूक आहे ? (SET 2017)

अ) आशीर्वाद

ब) आशिर्वाद

क) आर्शिवाद

ड) आर्शीवाद

  • अ) आशीर्वाद







प्रश्न 9.  भागवत धर्माचे प्रथम संघटक व प्रचारक कोण ? (SET 2017)

अ) संत ज्ञानेश्वर

ब) संत नामदेव

क) संत निवृत्तीनाथ

ड) संत चांगदेव

  • ब) संत नामदेव






प्रश्न 10.  मम्मटाने सांगितलेल्या काव्यप्रयोजनांपैकी संपूर्णतः कालबाह्य झालेले काव्यप्रयोजन कोणते ? (SET 2017)

अ) यश:प्राप्ती

ब) अर्थप्राप्ती

क) शिवेतरक्षती

ड) व्यवहारविद्

  • क) शिवेतरक्षती







प्रश्न 11. 1977 मध्ये ग्रामीण साहित्याचा पहिला मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता (SET 2019)

अ) कोल्हापूर

ब) पुणे

क) प्रवरानगर

ड) बारामती

  • ब) पुणे







प्रश्न 12. १९८१ चे तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते (SET 2019)

अ) कोपरगाव

ब) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

क) प्रवरानगर

ड) धुळे

  • क) प्रवरानगर







प्रश्न 13. 'दोन क्रांतिवीर' हे पुस्तक कोणी लिहिले आहे (SET 2019)

अ) व्यंकटेश आत्राम

ब) एकनाथ साळवे

क) माधव सरकुंडे

ड) गोविंद गारे

  • अ) व्यंकटेश आत्राम







प्रश्न 14. दुसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले (SET 2019)

अ) यवतमाळ

ब) वणी

क) चंद्रपूर

ड) भद्रावती

  • ब) वणी







प्रश्न 15. 'केसाळ काळंभोर पिल्लू', 'शामा' आणि 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या साहित्य कृतीसंबंधी निर्माण झालेल्या वादळामागील समान कारण कोणते ? (SET 2019)

अ) दुर्बोधता

ब) श्लील - अश्लीलते संबंधीची भूमिका

क) वेगवेगळ्या संघटनांचा विरोधी दृष्टिकोन

ड) तत्कालीन शासनाची भूमिका

  • ब) श्लील - अश्लीलते संबंधीची भूमिका
  • केसाळ काळंभोर पिल्लू - दिलीप पुरुषोत्तम चित्रे
  • श्यामा - चंद्रकांत काकोडकर
  • निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी - हनुमंत मोरेश्वर मराठे







प्रश्न 16. 'राष्ट्रवादाचे स्वच्छंदतावादी स्वरूप आणि वाङ्मयेतिहासातील आधुनिक प्रवृत्ती यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला' हे मत कुणाचे ? (SET 2019)

अ) रॉय पास्कल

ब) एम. एस. प्रावर

क) रेने वेलेक

ड) वसंत बापट

  • क) रेने वेलेक







प्रश्न 17. 'मिलटॉनिक सॉनेट' मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते ? (SET 2019)

अ) दहा आणि चार

ब) आठ आणि सहा

क) बारा आणि दोन

ड) नऊ आणि पाच

  • क) बारा आणि दोन







प्रश्न 18. लोककथांचा तौलनिक अभ्यास करून त्याची सूची तयार करणारा फिनलँडचा अभ्यास कोण ?  (SET 2019)

अ) जेम्स फॅरेर

ब) सी. एस. बर्न

क) अँटी अर्ने

ड) फँज बोआस

  • क) अँटी अर्ने






पुढे>>>>>>            <<<<<<मागे

 

 

 

 

 



 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 


No comments:

Post a Comment