SET/NET Marathi Paper 16
प्रश्न 1. भारतीय साहित्यशास्त्रातील रसविषयक विवेचनाला कोणत्या भारतीय तत्वज्ञानशाखेची बैठक लाभलेली आहे ? (SET April 2017)
अ) काश्मिरी शैव तत्वज्ञान
ब) बौद्ध तत्वज्ञान
क) अद्वैत तत्वज्ञान
ड) विशिष्टाद्वैत तत्वज्ञान
- अ) काश्मिरी शैव तत्वज्ञान
प्रश्न 2. 'साहित्य' हा शब्द कोणत्या साहित्यशास्त्रकाराने सांगितलेल्या काव्यलक्षणावरून आलेला आहे ? (SET April 2017)
अ) भामह
ब) दंडी
क) वामन
ड) आनंदवर्धन
- अ) भामह
प्रश्न 3. संस्कृत साहित्य - नाट्यशास्त्रातील मर्मदृष्टीचे प्रभावी उपयोजन पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने केले आहे ? (SET April 2017)
अ) पुष्पा भावे
ब) के. नारायण काळे
क) गो. के. भट
ड) श्री. ना. बनहट्टी
- क) गो. के. भट
प्रश्न 4. 'शैलीमिमांसा' हि संज्ञा कोणी प्रथम योजली आहे ? (SET April 2017)
अ) मिलिंद मालशे
ब) रमेश धोंगडे
क) अशोक केळकर
ड) म. सु. पाटील
- क) अशोक केळकर
प्रश्न 5. ग्रीस या देशात कोणत्या नाट्यप्रकाराचा उगम झालेला आहे ? (SET April 2017)
अ) सुखात्मिका
ब) शोकांतिका
क) प्रहसन
ड) ओभनाट्य
- ब) शोकांतिका
प्रश्न 6. अनुकरण आणि प्रभाव यांच्या मध्ये असलेला प्रदेश कोणता ? (SET April 2017)
अ) रुपांतर (adaptation)
ब) भाषांतर (translation)
क) स्वीकारप्रक्रिया (reception)
ड) आंतरसंहितात्मता (intertextuality)
- ड) आंतरसंहितात्मता (intertextuality)
प्रश्न 7. 'तंबी दुराई' या टोपणनावाने लेखन करणारे कोण आहेत ? (SET 2020)
अ) जयवंत दळवी
ब) श्रीकांत बोजेवार
क) विजय नेने
ड) के. ज. पुरोहित
- ब) श्रीकांत बोजेवार
प्रश्न 8. तिसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले ? (SET 2020)
अ) अमरावती
ब) नाशिक
क) किनवट
ड) नंदुरबार
- क) किनवट
प्रश्न 9. 'ती जनता अमर आहे' हि विंदा करंदीकरांची कविता कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती ? (SET 2020)
अ) अभिरुची
ब) सत्यकथा
क) मौज
ड) पंचधारा
- ब) सत्यकथा
प्रश्न 10. 'अचाट गावची अफाट मावशी' हे बालनाट्य कोणत्या संस्थेने सादर केले ? (SET 2020)
अ) चिल्ड्रन्स थिएटर
ब) लिटल थिएटर
क) बालनाट्य
ड) चंद्रशाळा
- क) बालनाट्य
प्रश्न 11. कादंबरीतून साहित्य संमेलनाच्या बऱ्या - वाईट गोष्टींचे चित्रण कोणत्या लेखकाने केले आहे ? (SET 2020)
अ) द. ता. भोसले
ब) वासुदेव मुलाटे
क) रंगनाथ पठारे
ड) नागनाथ कोत्तापल्ले
- क) रंगनाथ पठारे
प्रश्न 12. भरत, दंडी आणि वामन यांनी गुणांची संख्या किती मानली आहे ? (SET 2020)
अ) तीन
ब) दहा
क) चोवीस
ड) दोन
- ब) दहा
प्रश्न 13. 'बळी' या कादंबरीतील प्रमुख व्यक्तीरेखा कोणती ? (SET 2017 P2)
अ) तात्या
ब) आबा
क) बापू
ड) नाना
- ब) आबा
प्रश्न 14. मराठीमध्ये सर्वात जास्त प्रती कोणत्या अनुवादीत ग्रंथाच्या निघाल्या ? (SET 2017 P2)
अ) गीताई - विनोबा भावे
ब) गीतांजली - रवींद्रनाथ ठाकूर
क) तृणपर्णे - सदानंद रेगे
ड) पॅन्ट घातलेला ढग - ब्लादिमीर मायकोव्हस्की
- अ) गीताई - विनोबा भावे
प्रश्न 15. पुढीलपैकी कोणता अनुवाद विंदा करंदीकर यांनी केलेला नाही ? (SET 2017 P2)
अ) ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र
ब) फाउस्ट : भाग पहिला - गटे
क) राजा लिअर - शेक्सपिअर
ड) वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलीट्युड - गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ
- ड) वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलीट्युड - गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ
प्रश्न 16. मराठीमध्ये सर्वात जास्त अनुवादीत झालेला कादंबरीकार कोणता ? (SET 2017 P2)
अ) जेम्स हॅडली चेस
ब) सिडने शेल्डन
क) ॲगाथा ख्रिस्ती
ड) इयान फ्लेमींग
- अ) जेम्स हॅडली चेस
प्रश्न 17. अनुवादीत कादंबऱ्यातील व्यक्तिरेखा आणि त्यांचे मूळ लेखक यांच्या योग्य जोड्या लावा : (SET 2017 P2)
1. हर्क्युल पायरो 5. इयान फ्लेमिंग
2. जेम्स बॉंड 6. अर्ल स्टेन्ले. गार्डनर
3. पेरी मॅसन 7. जे. के. रोलिंग
4. हॅरी पॉटर 8. ॲगाथा ख्रिस्ती
9. सिडने शेल्डन
अ) 1 - 7, 2 - 6, 3 - 5, 4 - 8
ब) 1 - 8, 2 - 5, 3 - 6, 4 - 7
क) 1 - 9, 2 - 7, 3 - 8, 4 - 6
ड) 1 - 6, 2 - 8, 3 - 9, 4 - 5
- ब) 1 - 8, 2 - 5, 3 - 6, 4 - 7
प्रश्न 18. काव्यलक्षणासंबंधी संस्कृत साहित्य शास्त्रकारांनी केलेल्या विवादाचे कारण कोणते होते ? (SET 2017 P2)
अ) काव्यलक्षणाची शास्त्रशुद्ध उपपत्ती मांडण्याचा आटापिटा
ब) स्वतःच्या बुद्धी वैभवाचा गर्व
क) दुसऱ्या साहित्य शास्त्रकाराविषयीचा मत्सर
ड) वादविवादाची हौस
- अ) काव्यलक्षणाची शास्त्रशुद्ध उपपत्ती मांडण्याचा आटापिटा
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5 👉 SET NET History PYQ 24 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment