SET/NET Marathi Paper 34
Share करायला विसरू नका.......................
Prvious Year Questions................
अ) नागदेवाचार्यांनी नारायणबास विरचित ॠद्धिपूर वर्णनाच्या संदर्भात
ब) बाईदेवबासांनी भास्करभट्ट बोरीकरांच्या शिशुपालवधाच्या संदर्भात
क) महदंबेने दामोदर पंडित विरचित वछाहरणाच्या संदर्भात
ड) म्हाइंभटाने विश्वनाथबासकृत ज्ञानप्रभोधाच्या संदर्भात
प्रश्न 2. पुढीलपैकी कोणत्या कवीने 'रुक्मिणी स्वयंवर' लिहिले नाही ? (SET 2017 PIII)
अ) नरेंद्र
ब) शिवरामशंकर किंकर
क) सामराज
ड) एकनाथ
प्रश्न 3. जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्यायांमधून उचित पर्याय निवडा : (SET 2017 PIII)
1. अर्थसंकोच 5. वेणा
2. अर्थविस्तार 6. अपरोक्ष
3. रूपकजन्य बदल 7. साला
4. अर्थापकर्ष 8. दुधात साखर
9. प्रवीण
अ) 1 - 8, 2 - 5, 3 - 7, 4 - 9
ब) 1 - 5, 2 - 9, 3 - 8, 4 - 7
क) 1 - 5, 2 - 9, 3 - 6, 4 - 7
ड) 1 - 9, 2 - 8, 3 - 5, 4 - 6
प्रश्न 4. विश्वनाथाच्या 'वाक्यं रसात्मकं काव्यं' या काव्यलक्षणावर तीव्र आक्षेप घेऊन त्याविरोधात स्वतःचे काव्यलक्षण कोणी ठासून सांगितले ? (SET 2017 PIII)
अ) भोज
ब) जगन्नाथ
क) अभिनवगुप्त
ड) अप्पय्यदीक्षित
प्रश्न 5. समीक्षेच्या भाषेचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे ? (SET 2017 PIII)
अ) मिताक्षरी
ब) सुस्पष्टता
क) सूचकता
ड) भावपूर्णता
प्रश्न 6. 'सर्वेक्षण' या तंत्राचे उपयोजन कोणत्या समीक्षा पद्धतीमध्ये करता येते ? (SET 2017 PIII)
अ) समाजशास्त्रीय
ब) मानसशास्त्रीय
क) रुपवादी
ड) आस्वादक
प्रश्न 7. 'जी. ए. कुलकर्णींच्या कथा वाचतांना एखाद्या काळ्याशार खोल डोहात बुडी मारल्यासारखे वाटते' हा अभिप्राय कोणत्या प्रकारच्या समीक्षेचे उदाहरण आहे ? (SET 2017 PIII)
अ) रुपवादी
ब) आदिबंधात्मक
क) चरित्रात्मक
ड) आस्वादक
प्रश्न 8. 'प्रस्तुत नाटकाची रचना व त्यातील अंकांची मांडणी आशयानुरूप केलेली नाही त्यामुळे नाट्यपरिणाम क्षीण होतो' हा अभिप्राय कोणत्या प्रकारच्या समीक्षेचे उदाहरण आहे ? (SET 2017 PIII)
अ) शैलीवैज्ञानिक
ब) मानसशास्त्रीय
क) रुपवादी
ड) चरित्रात्मक
प्रश्न 9. 'पैस' या शब्दाचा अर्थ काय आहे ? (SET 2017 PIII)
अ) शर्यत
ब) अवकाश
क) पैज
ड) पैसा
प्रश्न 10. 'साहित्याच्या सर्व प्रकारांचे मूळ ऋतूकथांमध्ये (क्वेस्ट मिथ) मध्ये असते, असा सिद्धांत कोणी प्रतिपादन केला आहे ? (SET 2017 PIII)
अ) सुसान लँगर
ब) जेम्स फ्रेझर
क) नॉर्थोप फ्राय
ड) हर्बर्ट रीड
प्रश्न 11. 'सकळा' लिपीचे जनकत्व पुढीलपैकी कोणाकडे जाते ? (SET 2018 PIII)
अ) हरिबास
ब) खळोबास
क) भटोबास
ड) करणाधिप हेमाद्री
प्रश्न 12. 'भाषेतील अर्थयुक्त लघुतम ध्वनीगट असे कशाला म्हटले आहे ? (SET 2018 PIII)
अ) वाक्य
ब) पदिम
क) स्वनिम
ड) स्वनांतर
प्रश्न 13. 'ऐतिहासिक भाषाविज्ञान आणि एककालिक वर्णनात्मक भाषाविज्ञान यांचे स्वरूप, उद्दिष्ट आणि कार्यपद्धती यांबाबतीतील वेगळेपणा दाखवून एककालिक भाषाविज्ञानाचे महत्व पटवून दिले' हे कार्य पुढीलपैकी कोणी केले ? (SET 2018 PIII)
अ) सोस्यूर
ब) ब्लूमफिल्ड
क) चॉम्स्की
ड) हॉकेट
प्रश्न 14. मम्मटाने सांगितलेल्या काव्ययोजनांपैकी कोणत्या दोन प्रयोजनांचा विस्तार पुढे 'कलेसाठी कला' आणि 'जीवनासाठी कला' या वादात झालेला दिसतो ? (SET 2018 PIII)
अ) 'यशसे' व 'व्यवहारविदे'
ब) 'व्यवहारविदे' व 'शिवेतरक्षतये'
क) 'सद्य:परानिवृतये' व 'कांतासम्मिततयोपदेशयुजे'
ड) 'अर्थकृते' व 'यशसे'
प्रश्न 15. "अपूर्व वस्तूनिर्माणक्षमा प्रज्ञा प्रतिभा" या वाचनातील 'प्रज्ञा' या शब्दाची अर्थकक्षा पुढीलपैकी कोणती आहे ? (SET 2018 PIII)
अ) कल्पनाविलास करणारी बुद्धी
ब) भूत - वर्तमान - भविष्य यांचा वेध घेणारी बुद्धी
क) सारासारविवेक
ड) विचारशक्ती
प्रश्न 16. "संस्कृत साहित्यशास्त्रानुसार, प्रतिभा हि ईश्वरदत्त शक्ती आहे, म्हणून तिचे विश्लेषण करता येणे शक्य नाही." (SET 2018 PIII)
अ) वरील विधान पूर्णपणे असत्य आहे
ब) वरील विधान पूर्णतः सत्य आहे
क) वरील विधानाचा पूर्वार्ध सत्य आहे, परंतु उत्तरार्ध असत्य आहे
ड) वरील विधानाचा पूर्वार्ध सत्य नाही, परंतु उत्तरार्ध असत्य आहे
प्रश्न 17. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या योग्य जोड्या जुळवा : (SET 2018 PIII)
1. प्राचीन भारतीय लोकधर्म 5. सत्येंद्र
3. लोसाहित्य विज्ञान 7. उप्रेती कुंदनमल
अ) 1 - 8, 2 - 6, 3 - 5, 4 - 7
ब) 1 - 7, 2 - 5, 3 - 9, 4 - 6
क) 1 - 6, 2 - 9, 3 - 7, 4 - 5
ड) 1 - 5, 2 - 8, 3 - 6, 4 - 9
प्रश्न 18. वाङमयीन आत्मनिष्ठेचे व तादात्म्याचे विवेचन करताना आत्मिक अनुभव, त्याच्या बारिकसारीक अर्थच्छटांसह व अंगभूत सुसंगतीसह शब्दबद्ध करणे म्हणजे कविता लिहिणे अशी त्यांनी काव्यलेखनविषयक कल्पना गृहीत धरली आहे, असे सुधीर रसाळांनी कोणाविषयी म्हटले आहे ? (SET 2018 PIII)
अ) पुरुषोत्तम शिवराम रेगे
ब) बाळ सीताराम मर्ढेकर
क) शरच्चंद्र मुक्तिबोध
ड) विंदा करंदीकर
प्रश्न 19. "कवी आपले वक्तिमत्व किंवा भावना अभिव्यक्त करीत नाही तर तो त्यापासून मुक्तता मिळवतो" असे कोणी म्हटले आहे ? (SET 2018 PIII)
अ) सॅम्युअल टेलर कोलरीज
ब) टी. एस. एलिएट
क) सिग्मंड फ्रॉइड
ड) कार्ल गुस्ताव युंग
प्रश्न 20. "कथेतील निवेदकामागे जो तथागत लेखक असतो तो लौकीक लेखकाहून वेगळा असतो कारण वेगळ्या मूल्यांचा पुरस्कार करणारा लौकिक लेखक कथागत लेखक म्हणून कथनात्म लेखन करताना कथेगणिक वेगवेगळी मूल्यदृष्टी, विचारप्रणाली, कलादृष्टी व भूमिका घेत असतो" हे मत कोणाचे ? (SET 2018 PIII)
अ) गंगाधर गाडगीळ
ब) गंगाधर पाटील
क) शरच्चंद्र मुक्तिबोध
ड) प्रल्हाद वडेर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 SET NET History PYQ 23 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment