Friday, April 07, 2023

SET NET PET मराठी पेपर २

 SET NET PET 
मराठी

प्रश्न १. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा.

  i) ओवी ते लावणी                1) प्रभाकर पुजारी

  ii)  गंगाजळी                       2) श्री. रं. कुलकर्णी

  iii) भक्तिशोभा                   3) विलास खोले

  vi) सामर्थ्ययोगी रामदास    4) रा. चिं.  ढेरे

अ) i – 1,  ii – 4,  iii – 3,  vi - 2

ब) i – 4,  ii – 2,  iii – 1,  vi - 3

क) i – 3,  ii – 2,  iii – 1,  vi - 4

ड) i 2,  ii 4,  iii 1,  vi - 3   

  • ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3





  • प्रश्न २. चौंडक, भंडारभोग, धिंगाणा, तणकट व ब-बळीचा ह्या कादंबर्‍या पुढीलपैकी कोणी लिहिल्या आहेत?

    अ) ह. ना. आपटे

    ब) डॉ. राजन गवस

    क) ग. ल. ठोकळ

    ड) शंकर पाटील

  • ब) डॉ. राजन गवस





  • प्रश्न ३. ‘एका कोळियानेहे पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचे भाषांतर आहे? (Sep 2015)

    अ) द ओल्ड मॅन अँड द सी

    ब) पिग्मॅलियन

    क) अ‍ॅनिमल फॉर्म

    ड) फाऊन्टनहेड

  • अ) द ओल्ड मॅन अँड द सी 
  • द ओल्ड मॅन अँड द सी - एका कोळियाने (पु. ल. देशपांडे)





  • प्रश्न ४. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण? (May 2016)

    अ) लक्ष्मणशास्त्री जोशी

    ब) महादेवशास्त्री जोशी

    क) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव

    ड) रा. ग. जाधव

  • अ) लक्ष्मणशास्त्री जोशी





  • प्रश्न ५. पुढीलपैकी कोणता कथासंग्रह प्रिया तेंडूलकर यांनी लिहिलेला आहे? (Sep 2015)

    अ) ज्याचा त्याचा प्रश्न

    ब) चाहूल

    क) बाहुल्या

    ड) आहे हे असं आहे

  • अ) ज्याचा त्याचा प्रश्न 
  • चाहूल - अरविंद गोखले 
  • बाहुल्या – सुनीति आफळे 
  • आहे हे असं आहे – गौरी देशपांडे



  • प्रश्न ६. कोणत्या कादंबरीला गांधीहत्येची पार्श्वभूमी आहे(June 2019)

    अ) धग

    ब) वावटळ

    क) टारफुला

    ड) बनगरवाडी

  • ब) वावटळ 
  • धग - उद्धव शेळके
  • टारफुला - शंकर पाटील 
  • वावटळ व बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर



  • प्रश्न ७. ‘मॅकबेथया शेक्सपिअरच्या नाटकांचा मराठीत अनुवाद कोणी केला(Dec 2020)

    अ) राम गणेश गडकरी

    ब) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

    क) गोविंद बल्लाळ देवल

    ड) वि. वा. शिरवाडकर

  • ड) वि. वा. शिरवाडकर 
  • मॅकबेथ - राजमुकुट(मराठी अनुवाद)




  • प्रश्न ८. एका काट्याच्या अणीवर बसली तीन गावं

              दोन ओसाड वा एक वसेची ना

              वसेचिना वसेचिना, तेथे आले तीन कुंभार

              दोन आंधळे एक दिसेचिना.

              हे भारुड कोणी रचले आहे. (Dec 2020)


    अ) संत दासोपंत

    ब) संत एकनाथ

    क) संत नामदेव

    ड) संत ज्ञानदेव

  • ड) संत ज्ञानदेव





  • प्रश्न ९. ‘भारतीय संदर्भातून स्त्रीवाद व स्त्रीवादी समीक्षाअशी मांडणी ग्रंथरूपाने कोणी केली आहे(Jan 2018)

    अ) शोभा नाईक

    ब) कुमुद पावडे

    क) कुमुद मोरे

    ड) सौदामिनी राव

  • अ) शोभा नाईक





  • प्रश्न १०. ‘वाङ्मयीन महात्मता’ हि संकल्पना कोणी मांडली आहे(April 2017)

    अ) मे. पुं. रेगे

    ब) रा. भा. पाटणकर

    क) बा. सी. मर्ढेकर

    ड) प्रभाकर पाध्ये

  • क) बा. सी. मर्ढेकर






  • प्रश्न ११. ‘माझ्या मना बन दगड’ हि कविता कोणाची आहे? (May 2016)

    अ) बा. सी. मर्ढेकर

    ब) नारायण सुर्वे

    क) विंदा करंदीकर

    ड) केशव मेश्राम

  • क) विंदा करंदीकर





  • प्रश्न १२. ‘टेनिसनच्या प्रिन्सेसची अनुकृती इंदिराहे दीर्घकाव्य कोणी रचले आहे(Jan 2018)

    अ) विनायक ओक

    ब) कान्होबा कीर्तीकर

    क) पांडुरंग चिंतामणी पेठकर

    ड) म. मो. कुंटे

  • ब) कान्होबा कीर्तीकर





  • प्रश्न १३. ‘पासंगहा समीक्षात्मक लेखसंग्रह पुढीलपैकी कोणी लिहिला आहे? (Jan 2018)

    अ) वा. ल. कुलकर्णी

    ब) व. दि. कुलकर्णी

    क) कुसुमावती देशपांडे

    ड) गो. म. कुलकर्णी

  • क) कुसुमावती देशपांडे





  • प्रश्न १४. ‘अभिरुचीया नियतकालिकाचे प्रवर्तक कोण(May 2016)

    अ) अनंत काणेकर

    ब) पु. आ. चित्रे

    क) मं. वि. राजाध्यक्ष

    ड) श्री. पु. भागवत

  • ब) पु. आ. चित्रे





  • प्रश्न १५. ‘आई रिटायर होते’ या नाटकाचे लेखक कोण आहेत? (Jan 2018)

    अ) वसंत कानेटकर

    ब) प्रशांत दळवी

    क) सुरेश खरे

    ड) अशोक पाटोळे

  • ड) अशोक पाटोळे





  • प्रश्न १६. ‘पोतहि संकल्पना कोणी मांडली आहे(April 2017)

    अ) द. ग. गोडसे

    ब) बा. सी. मर्ढेकर

    क) दि. के. बेडेकर

    ड) माधव आचवल

  • अ) द. ग. गोडसे





  • प्रश्न १७.‘आलोचनाह्या वाङ्मयीन नियतकालिकाचे प्रवर्तक कोण(Sep 2015)

    अ) राजा ढाले

    ब) मं. वि. राजाध्यक्ष

    क) वसंत दावतर

    ड) श्री. पु. भागवत

  • क) वसंत दावतर





  • प्रश्न १८. ‘देशीकार लेणेहे कोणत्या ग्रंथास उद्देशून म्हटले जाते? (May 2016)

    अ) साती ग्रंथ

    ब) ज्ञानेश्वरी

    क) अमृतानुभव

    ड) गाथा

  • ब) ज्ञानेश्वरी





  • प्रश्न १९. पुढीलपैकी वि. भि. कोलते लिखित आत्मचरित्र कोणते(June 2019)

    अ) कृतज्ञ मी कृतार्थ मी

    ब) अजून चालतोचि वाट

    क) आनंदयात्रा

    ड) जडणघडण

  • ब) अजून चालतोचि वाट 
  • कृतज्ञ मी कृतार्थ मी - धनंजय कीर 
  • आनंदयात्रा - ग.वा. बेहेरे 
  • जडणघडण - आ.ना. होगे पाटील





  • प्रश्न २०. ‘तौलनिक समीक्षेचा जनकअसे कोणास म्हटले जाते(Dec 2020)

    अ) जॉन ड्रायडन

    ब) मॅथ्यु आर्नोल्ड

    क) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

    ड) हरी नारायण आपटे

  • अ) जॉन ड्रायडन





  • प्रश्न २१. ‘चारुता सागरया टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे मूळ नाव सांगा? (Jan 2018)

    अ) मा. ना. पाटील

    ब) म. ना. भोसले

    क) दिनकर दत्तात्रय भोसले

    ड) रामचंद्र बाबर

  • क) दिनकर दत्तात्रय भोसले







  • पुढे >>>>>>>                         <<<<<<< मागे




     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    No comments:

    Post a Comment