SET/NET History 3
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. खालीलपैकी कोणती पद्धत ही पुरातत्वीय स्थळांच्या समन्वेषणाची शास्त्रीय पद्धत नाही ? (SET 2021)
अ) लेरिसी परिदर्शक
ब) हवाई छायाचित्रण
क) विद्युतप्रतिरोध सर्वेक्षण
ड) गावांच्या अभ्यासाचे नाव
प्रश्न 2. मौर्य राजा दशरथ याच्या बराबर लेणी शिलालेखात ________ यांच्यासाठी लेणी कोरल्याचा उल्लेख आहे. (SET 2021)
अ) जैन
ब) बौद्ध
क) भागवत
ड) आजीविक
प्रश्न 3. सर्वप्रथम 'भारतवर्ष' चा उल्लेख कोणत्या पुराभिलेखात आहे ? (SET 2021)
अ) गिरणार येथील सम्राट अशोकचा अभिलेख
ब) हाथीगुहेतील खारवेल राजाचा अभिलेख
क) समुद्रगुप्तराजाची प्रयाग प्रशस्ती
ड) रुद्रदमनचा जुनागड येथील प्रस्तर लेख
प्रश्न 4. _________ शिलालेखाच्या शोधानंतर कुषाण राजवंशाच्या वंशावली वर नवा प्रकाश पडला आहे. (SET 2021)
अ) रबाटक
ब) कंदहार
क) तक्षशिला
ड) बामियान
प्रश्न 5. बोधिसत्व स्थितीमध्ये ___________. (SET 2021)
अ) व्यक्ती गृहत्याग करतो आणि ज्ञानप्राप्तीसाठी भटका होतो
ब) व्यक्ती सुधारक होतो आणि सामाजिक अडचणींच्या विरुद्ध लढतो
क) व्यक्ती बुद्धपदाच्या जवळ पोहचतो, भूतदया बाळगतो व तसेच तो सर्वज्ञान प्राप्तीच्या निकट असतो
ड) व्यक्ती बुद्धविहाराचा प्रमुख बनतो आणि सर्वांची काळजी घेतो
प्रश्न 6. खालीलपैकी कोणते स्थळ बौद्ध स्तूप असलेले स्थळ नाही ? (SET 2021)
अ) पवनी
ब) भितरगाव
क) भट्टीप्रोलू
ड) वैशाली
प्रश्न 7. प्राचीन भारतीय व्यापारीमार्गांमध्ये खालीलपैकी कोणते शहर उत्तरपथ आणि दक्षिणपथ या मार्गांच्या छेदबिंदू वर वसलेले होते ? (SET 2021)
अ) मथुरा
ब) प्रयाग
क) द्वारका
ड) हम्पी
प्रश्न 8. महाराष्ट्रातील ________ या स्थळावरून पोसिडॉन या रोमन सागरी देवतेची प्रतिमा मिळाली. (SET 2021)
अ) ब्रम्हपुरी
ब) भोकरदन
क) जुन्नर
ड) अडम
प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने अलीकडे महरौली स्तंभलेखात उल्लेखित राजा चंद्र याची ओळख गुप्त सम्राट समुद्रगुप्त सोबत केलेली आहे ? (SET 2021)
अ) श्रीराम गोयल
ब) परमेश्वरीलाल गुप्त
क) रामशरण शर्मा
ड) अमितेश्वर झा
प्रश्न 10. दामोदरपूर पटानुसार उपरीक म्हणजे ________. (SET 2021)
अ) दरबारातील अधिकारी
ब) प्रांतिक अधिकारी
क) ग्राम अधिकारी
ड) व्यापार - उद्दीम अधिकारी
प्रश्न 11. महापाषाणीय शिलावर्तुळांच्या उत्खननासाठी खालीलपैकी कोणती उत्खनन पद्धती अवलंबात आणली जाते ? (SET 2024)
अ) उत्सेध
ब) चाचणी खड्डा
क) आयत
ड) वृत्तपाद
प्रश्न 12. खालीलपैकी कोणते स्थळ हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणीय स्थळाचे उदाहरण नाही ? (SET 2024)
अ) भोकरदन
ब) इनामगाव
क) जोर्वे
ड) सावळदे
प्रश्न 13. ऋग्वेदीक कालखंडात खालीलपैकी कोणती संज्ञा वेळेच्या ओळखीसाठी प्रचलित होती ? (SET 2024)
अ) गोत्र
ब) गवेषणा
क) गविष्टी
ड) गोधुली
प्रश्न 14. चेदी महाजनपदाची राजधानी काय आहे ? (SET 2024)
अ) चंपा
ब) सोत्थीवतीनगर
क) पावा
ड) मिथिला
प्रश्न 15. भारतीय बौद्धांचा ऐतिहासिक नोंदी जतन केलेल्या आर्य मंजुश्रीमूलकल्प या महत्वाच्या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा उल्लेख आढळून येत नाही ? (SET 2024)
अ) गुप्त
ब) मैत्रक
क) वाकाटक
ड) पुष्यभूती
प्रश्न 16. अमरसिंहाने त्याच्या अमरकोश नामक कृतीत इतिहास म्हणजे ________ असे विशद केले आहे. (SET 2024)
अ) आख्यान
ब) इतिवृत्त
क) पुराण
ड) पुरावृत्त
प्रश्न 17. मौर्य सम्राट अशोक यांच्या निगलीसागर स्तंभलेखात __________ बुद्धाच्या स्तूपाचा उल्लेख आढळून येतो. (SET 2024)
अ) कनकमुनि
ब) शाक्यमुनी
क) अमिताभ
ड) विपस्सी
प्रश्न 18. द्वितीय बौद्ध संगीती ______ राजाच्या कारकिर्दीत संप्पन झाली होती. (SET 2024)
अ) अजातशत्रू
ब) धनानंद
क) वितशोक
ड) कालाशोक
प्रश्न 19. सिंधचे स्थानिक इतिवृत्त चचनामा मुळत: _________ मध्ये लिहिले होते. (SET 2024)
अ) अरेबिक
ब) सिंधी
क) पर्शियन
ड) संस्कृत
प्रश्न 20. खालीलपैकी कोणता राजवंशाचा राजतरंगिणीत उल्लेख प्राप्त होत नाही ? (SET 2024)
अ) कर्कोटक
ब) वाकाटक
क) मौर्य
ड) कुषाण
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment