Monday, October 30, 2023

भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC Geography MCQ In Marathi || mpsc pyq

 

भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8
MPSC Geography MCQ In Marathi

mpsc previous year questions || mpsc pyq || mpsc maharashtracha bhugol || mpsc bhartacha bhugol || geography questions in marathi



प्रश्न 1. खालील कोणती तापीची उपनदी नाही ? (ASO 2016)

अ) पूर्णा

ब) पांझरा

क) दुधना

ड) गिरणा

  • क) दुधना




  • प्रश्न 2. खालीलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ?

    अ) पंचगंगा

    ब) वेदगंगा

    क) कृष्णा

    ड) प्राणहिता

  • अ) पंचगंगा




  • प्रश्न 3. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात ?

    अ) इंदिरा गोदी

    ब) ससून गोदी

    क) माझगाव गोदी

    ड) प्रिन्सेस गोदी

  • क) माझगाव गोदी




  • प्रश्न 4.  खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही ? (PSI 2011)

    अ) नागपूर

    ब) भिवंडी

    क) पुणे

    ड) बुलढाणा

  • ड) बुलढाणा




  • प्रश्न 5. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? (ASO 2012)

    अ) मुंबई उपनगर

    ब) कोल्हापूर

    क) अमरावती

    ड) छत्रपती संभाजीनगर

  • अ) मुंबई उपनगर




  • प्रश्न 6. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात ? (PSI 2013)

    अ) बागर

    ब) घग्गर

    क) बांगर

    ड) खादर

  • अ) बागर





  • प्रश्न 7. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे ? (STI 2012)

    अ) कोकण किनारा 

    ब) मलबार किनारा

    क) कोरोमंडल किनारा

    ड) दक्षिण किनारा

  • क) कोरोमंडल किनारा




  • प्रश्न 8. महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी सुमारे _______ किमी आहे. (ASO 2011)

    अ) 600 किमी

    ब) 700 किमी

    क) 720 किमी

    ड) 800 किमी

  • ड) 800 किमी




  • प्रश्न 9. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम कोणता. योग्य पर्याय निवडा.

    1)पुणे      2)छत्रपती संभाजीनगर 3)नाशिक 4)नागपूर      5)अमरावती       6)कोकण 

    अ) 2, 3, 4, 1, 5 आणि 6

    ब) 6, 2, 3, 4, 1 आणि 5

    क) 2, 3, 1, 4, 5 आणि 6

    ड) 2, 3, 5, 4, 6 आणि 1

  • क) 2, 3, 1, 4, 5 आणि 6




  • प्रश्न 10. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान _______ खिंड आहे. (combine B 2017)

    अ) थळघाट

    ब) फोंडाघाट

    क) पालघाट

    ड) कुंभार्लीघाट

  • क) पालघाट




  • प्रश्न 11. काजळी नदीवर ________ ची खाडी आहे. 

    अ) भाट्ये

    ब) तेरेखोल

    क) जैतापूर

    ड) वसई

  • अ) भाट्ये




  • प्रश्न 12. भारतातील सर्वात प्राचीन लेणी ‘पितळखोरे लेणी’ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    अ) बुलढाणा

    ब) नाशिक

    क) ठाणे

    ड) छत्रपती संभाजीनगर

  • ड) छत्रपती संभाजीनगर







  • पुढे >>>>>>                    <<<<<< मागे
     
     
     


    No comments:

    Post a Comment