भूगोल सराव प्रश्नसंच भाग ६
MPSC Geography Questions In Marathi
प्रश्न १. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
अ) तानाजीसागर
ब) नाथसागर
क) मुक्ताईसागर
ड) लक्ष्मीसागर
प्रश्न २ . ‘गुगामल’ राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अ) अमरावती
ब) नागपूर
क) यवतमाळ
ड) सांगली
प्रश्न ३ . _______ या खनिजापासून अॅल्युमिनियम मिळते.
अ) क्रोमाईट
ब) बॉक्साईट
क) मॅंगनीज
ड) यापैकी नाही
प्रश्न ४. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा ‘पश्चिम महाराष्ट्र’ या प्रादेशिक विभागात सहभाग होत नाही ?
अ) पुणे
ब) नाशिक
क) सातारा
ड) धाराशिव
प्रश्न ५. _______ नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय ‘लक्ष्मीसागर’ नावाने ओळखला जातो.
अ) वेण्णा
ब) कोयना
क) भोगावती
ड) कृष्णा
प्रश्न ६. कोकण भागात _______ या प्रकारची मृदा आढळते.
अ) रेगुर
ब) जांभी
क) काळी
ड) वालुकामय
प्रश्न ७. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून _____ नदी वाहते.
अ) दमणगंगा
ब) कुंडलिका
क) तेरेखोल
ड) वैतरणा
प्रश्न ८. भारत व _______ देशा दरम्यान ‘पांबन’ बेट आहे ?
अ) श्रीलंका
ब) मालदिव
क) म्यानमार
ड) नेपाळ
प्रश्न 9. पुढीलपैकी कोणकोणत्या अभयारण्यांचा समावेश अमरावती विभागात होईल.
1)टिपेश्वर 2)ज्ञानगंगा 3)अनेर 4)बोर 5)नरनाळा 6)ताम्हिणी 7)वाण
अ) 1, 2, 4 आणि 6
ब) 3, 4, 5 आणि 7
क) 1, 2, 5 आणि 7
ड) 2, 3, 4 आणि 6
प्रश्न 10.योग्य पर्याय निवडा. (जलविद्युत प्रकल्प - जिल्हे)
1) तिल्लारी - कोल्हापूर
2) येलदरी - परभणी
3) घाटघर - अहमदनगर
अ) फक्त 1
ब) फक्त 2
क) 1 आणि 3 फक्त
ड) वरील सर्व
प्रश्न 11. चूकीची जोडी ओळखा (नद्या व धबधबे)
अ) इरावती – जोग धबधबा
ब) घटप्रभा - गोकाक
क) नर्मदा - कपिलधारा
ड) चंबळ - चुलिया
प्रश्न 12. खालील नद्यांच्या खोर्यांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा व योग्य पर्याय निवडा.
अ) कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा
ब) गोदावरी, नर्मदा, कावेरी, कृष्णा
क) गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी
ड) कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी
प्रश्न १३. जोड्या लावा. (पुळण - जिल्हे)
a) उभादांडा - 1) सिंधुदुर्ग
b) नंदगाव - 2) रायगड
c) मारवे - 3) मुंबई
d) सातपाटी - 4) पालघर
अ) a - 1, b - 2, c - 3, d - 4
ब) a - 1, b - 3, c - 2, d - 4
क) a - 4, b - 3, c - 2, d - 1
ड) a - 3, b - 2, c - 4, d - 1
प्रश्न १४. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
अ) खोपोली
ब) कोयना
क) वैतरणा
ड) वरीलपैकी नाही
प्रश्न १५. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो ?
अ) मराठवाडा
ब) विदर्भ
क) पश्चिम महाराष्ट्र
ड) कोंकण
प्रश्न १६. जोड्या लावा. (प्रदेश/राज्य - स्थलांतरित शेतीचे नाव)
a) पश्चिम घाट - 1) कुमरी
b) मेघालय - 2) झूम
c) मध्यप्रदेश - 3) पेंडा
d) ओरिसा - 4) पोडू
अ) a - 1, b - 2, c - 3, d - 4
ब) a - 2, b - 3, c - 4, d - 1
क) a - 1, b - 3, c - 2, d - 4
ड) a - 2, b - 1, c - 4, d - 3
प्रश्न १७. महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
अ) शंभूमहादेव, हरीश्चंद्रगड, सातमाळ, अजंठा
ब) अजंठा, सातमाळ, हरीश्चंद्रगड, शंभूमहादेव
क) सातमाळ, शंभूमहादेव, हरीश्चंद्रगड, अजंठा
ड) अजंठा, सातमाळ, शंभूमहादेव, हरीश्चंद्रगड
प्रश्न १८. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?
अ) घटप्रभा
ब) कृष्णा
क) गोदावरी
ड) तापी
प्रश्न १९. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा.
अ) तेरेखोल, विजयदुर्ग, केळशी, राजापुरी
ब) विजयदुर्ग, केळशी, तेरेखोल, राजापुरी
क) तेरेखोल, विजयदुर्ग, राजापुरी, केळशी
ड) राजापुरी, केळशी, विजयदुर्ग, तेरेखोल
प्रश्न २०. जोड्या लावा.(नद्या व उगमस्थान राज्य)
a) गोदावरी - 1) महाराष्ट्र
b) वर्धा - 2) मध्यप्रदेश
c) इंद्रावती - 3) ओडिशा
d) पेन्नार - 4) कर्नाटक
अ) a - 1, b - 2, c - 3, d - 4
ब) a - 4, b - 3, c - 1, d - 2
क) a - 1, b - 2, c - 4, d – 3
ड) a - 3, b - 1, c - 4, d – 2
No comments:
Post a Comment