भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 11
MPSC Indian Polity MCQ In Marathi
प्रश्न 1. धनविधेयक _______ प्रस्तुत केले जाते. (STI 2012)
अ) दोन्ही सभागृहात
ब) फक्त लोकसभेत
क) फक्त राज्यसभेत
ड) फक्त राष्ट्रपतींकडून
प्रश्न 2 . खालील विधाने पहा: (ASO 2013)
1) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही.
2) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
अ) फक्त 1
ब) फक्त 2
क) 1 आणि 2
ड) दोन्हीही नाही
प्रश्न 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ? (combine c 2018)
अ) अनुच्छेद 75
ब) अनुच्छेद 74
क) अनुच्छेद 73
ड) अनुच्छेद 76
प्रश्न 4. लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या कायद्याच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती ?
अ) 1758 चा कायदा
ब) 1909 चा कायदा
क) 1919 चा कायदा
ड) 1935 चा कायदा
प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ? (combine c 2018)
अ) बिहार
ब) ओडिशा
क) तामिळनाडू
ड) उत्तरप्रदेश
प्रश्न 6. _______ अनुच्छेदानुसार संसद आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्यसुचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते.
अ) अनुच्छेद 368
ब) अनुच्छेद 124
क) अनुच्छेद 343
ड) अनुच्छेद 253
प्रश्न 7. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे _______ होय. (PSI 2011)
अ) राज्य विधिमंडळ
ब) कार्यकारी मंडळ
क) संसद
ड) न्यायमंडळ
प्रश्न 8. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते ? (ASO 2011)
अ) 7
ब) 15
क) 16
ड) 14
प्रश्न 9. संसद राज्यातील विधान परिषद _______ च्या शिफारशीवरून रद्द करू शकते. (ASO 2016)
अ) राष्ट्रपती
ब) राज्यपाल
क) राज्य मंत्रीमंडळ
ड) राज्य विधानसभा
प्रश्न 10. राज्यपाल अनुच्छेद ______ अनुसार विधानसभेत अँग्लो - इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात.
अ) अनुच्छेद 331
ब) अनुच्छेद 333
क) अनुच्छेद 213
ड) अनुच्छेद 72
प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ? (PSI 2013)
अ) राष्ट्रपती
ब) राज्यपाल
क) मुख्य निवडणूक आयुक्त
ड) सरवोच न्यायालयाचे न्यायाधीश
प्रश्न 12. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ? (STI 2011)
अ) मुख्यमंत्री
ब) राज्यपाल
क) स्पीकर
ड) उपमुख्यमंत्री
mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi
No comments:
Post a Comment