SET/NET History 16
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. अन्नाचे उत्पादन करणाऱ्या (शेती) सुरुवातीच्या समूहांचा उदय ________ या कालखंडात बलुचिस्तान आणि विंध्य पर्वतांच्या उत्तर रांगांत झाला. (SET 2016 P3)
अ) इ. स. पू. 1000 - 500
ब) इ. स. पू. 7000 - 3000
क) इ. स. पू. 3000 - 2000
ड) इ. स. पू. 2000 - 1000
प्रश्न 2. ________ या संशोधकाने कोणत्याही हडप्पा संस्कृतीच्या स्थानाचे उत्खनन केले नाही. (SET 2016 P3)
अ) राखालसदास बॅनर्जी
ब) माधो स्वरूप वत्स
क) दया राम साहनी
ड) व्हि. गॉर्डन शिल्ड / चाइल्ड
अ) चाल्सेडोनी
ब) स्टीटाइट
क) क्वार्ट्झ
ड) लेपीस - लाझुली
प्रश्न 4. आदिपुराण _______ यांनी रचले ? (SET 2016 P3)
अ) सोमदेव
ब) जिनसेन
क) वराहमिहीर
ड) अश्वघोष
प्रश्न 5. राजाच्या दिनक्रमामध्ये कौटिल्याने रात्रीचे _______ भाग केले. (SET 2016 P3)
अ) पाच
ब) सहा
क) सात
ड) आठ
प्रश्न 6. जातक कथानुसार लोकांकडून कर गोळा करण्याचे काम कोण करत होते ? (SET 2016 P3)
अ) रज्जूक व दण्डिन
ब) भागकर व भागदूत
क) तुंदियस् व अकसीयस्
ड) पुरोहीत व राजाचार्य
प्रश्न 7. अशोकाने आपल्या राज्यकाळात कोणत्या अधिकाऱ्याची नव्याने नेमणूक केली ? (SET 2016 P3)
अ) प्रादेशिक
ब) धर्म महामात्र
क) युक्त
ड) राजूक
प्रश्न 8. पाषाण - कलेचे नमुने ________ या ठिकाणी नाहीत. (SET 2016 P3)
अ) मास्की
ब) भीमबेटका
क) पिक्लीहाल
ड) दायमाबाद
प्रश्न 9. खालीलपैकी कोणते भुर्तहरीच्या तीन शतकांचा भाग नाही ? (SET 2016 P3)
अ) नीती शतक
ब) शृंगार शतक
क) वैराग्य शतक
ड) आचार शतक
प्रश्न 10. शून्यवादाच्या सिद्धांताचे श्रेय कोणाला दिले जाते ? (SET 2016 P3)
अ) उपाली
ब) आनंद
क) नागार्जुन
ड) बावरी
प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या युद्धाने फ्रेंच सत्तेचे भारतातील भवितव्य संपुष्टात आले ? (SET 2017 P2)
अ) पहिले कर्नाटक युद्ध
ब) बक्सरचे युद्ध
क) प्लासीचे युद्ध
ड) वांदीवॉशचे युद्ध
प्रश्न 12. इ. स. 1856 मध्ये अवध प्रांत ब्रिटिश कंपनीत सामील करण्यात आला, याचे कारण _______ हे होय. (SET 2017 P2)
अ) कायदेशीर वारसाचा अभाव
ब) भोंगळ प्रशासन
क) युद्धात झालेला पराभव
ड) अलाहाबादचा तह
प्रश्न 13. वि. दा. सावरकरांचे कोणते पुस्तक 1908 च्या शेवटी पॅरिसमध्ये प्रकाशित झाले आणि भारतात चोरून पाठवतांना 'रॅन्डम पेपर्स ऑफ द पिकवीक क्लब' या नावाने भारतात आणले गेले ? (SET 2017 P2)
अ) अ फ्यू वर्ड्स अबाऊट द रेड पॅम्फलेट
ब) द इंडिअन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स ऑफ 1857
क) काळेपाणी
ड) दि अदर साईड ऑफ द मेडल
प्रश्न 14. खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ? (SET 2017 P2)
अ) सी. आर. रेड्डी - प्रजामित्रमंडळी
ब) म. ज्योतिबा फुले - सत्यशोधक समाज
क) आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज
ड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - शेड्युल कास्ट्स फेडरेशन
प्रश्न 15. म. गांधी यांनी कोणाच्या विनंतीवरून चंपारण या भागाला भेट देण्याचे ठरविले होते ? (SET 2017 P2)
अ) राजेंद्र प्रसाद
ब) जे. बी. क्रिपलानी
क) राजकुमार शुक्ला
ड) ब्रिज किशोर
प्रश्न 16. 1784 चा पिटचा भारत कायदा कोणत्या हेतूने प्रेरीत होता ? (SET 2018 P2)
अ) इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीवर पार्लमेंटची थोडीबहुत सत्ता आणणे
ब) ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात कपात करणे
क) कंपनीच्या व्यापारी हक्कांवर नियंत्रण आणणे
ड) कंपनीला राजकीय सत्ताविरहीत अशी व्यापारी पेढी बनविणे
प्रश्न 17. ईस्ट इंडिया कंपनीची चहाचा व्यापार आणि चीनसोबतच्या व्यापारातील मक्तेदारी कोणत्या कायद्याने नष्ट झाली ? (SET 2018 P2)
अ) रेग्युलेटींग ॲक्ट 1773
ब) पिटचा इंडिया ॲक्ट 1784
क) चार्टर ॲक्ट 1813
ड) चार्टर ॲक्ट 1833
प्रश्न 18. बंगालच्या कोणत्या नबाबाने ढाक्याहून मुर्शिदाबादला राजधानी हलवली ? (SET 2018 P2)
अ) मीर कासीम
ब) सिराज उद्दौला
क) मुर्शीद कुली खान
ड) मीर जाफर
प्रश्न 19. रामप्रसाद बिस्मील यांचे नाव कशाशी संबंधित आहे ? (SET 2018 P2)
अ) कानपुर कट खटला
ब) अलीपूर कट खटला
क) काकोरी कट खटला
ड) मिरत कट खटला
प्रश्न 20. कोणत्या जेल (तुरुंग) मध्ये जवाहरलाल नेहरूंनी 'डिसकव्हरी ऑफ इंडिया' नावाचा ग्रंथ लिहीला ? (SET 2018 P2)
अ) पुणे जेल
ब) अहमदनगर जेल
क) आर्थर जेल
ड) पाटणा जेल
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारताचा महान्यायवादी
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 2
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment