■ दृकचित्रवाणी
या दृक -
श्राव्य माध्यमांचा विशेष परिचय (भारतातील
दूरदर्शनचा प्रारंभ व विकास यांचा संक्षिप्त आढावा)
● दूरदर्शन
दृक -
श्राव्य माध्यम आहे. म्हणजेच दूरदर्शन
आपण एकाच वेळी ऐकूही शकतो आणि पाहूही शकतो.
● संपूर्ण जगातील माहिती दूरदर्शन या
माध्यमातून आपल्या घरादारात पोहचत आहे.
● या माहितीमुळे
आपण विश्र्वाचे अविभाज्य घटक बनत चाललो आहोत.
● दूरदर्शन हा जवजवळ सगळ्यांचाच आयुष्याचा अविभाज्य घटक बनला
आहे.
● या माध्यमाची
एक स्वतःची परिभाषा आहे.
● 'बर्नाड शॉ' यांनी दूरदर्शन बाबत विनोदाने असे म्हटले की, 'संपूर्ण जग एका खोक्यात बंदिस्त केले.'
■ भारतातील
दूरदर्शनचा प्रारंभ व विकास :-
● दूरदर्शनची सुरवात १९५९ मध्ये दिल्ली येथे झाली.
● मुंबई, कोलकाता, चैन्नई या
महानगरात 'ब्लॅक अँड व्हॉईट' दूरदर्शनचा जमाना सुरू झाला.
● ९० च्या दशकात दूरदर्शन रंगीत झाला, नंतर त्याला उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जोड मिळाली.
● रंगीत प्रसारणाची सुरुवात नवी दिल्ली १९८२ मध्ये झाली.
● दूरदर्शनवर आंतरराष्ट्रीय चॅनल डि. डि. इंडिया ची सुरुवात
१४ मार्च १९९५ मध्ये झाली.
राजधानी दिल्ली करीता
१९८४ मध्ये मेट्रो वाहिनी चालू करण्यात आली. नंतर तिचा विस्तार मुंबई, कलकत्ता,आणि मद्रास असा करण्यात आला.
● खेळाचे चॅनल डी. डी. स्पोटर्स ची
सुरुवात १८ मार्च १९९९ मध्ये झाली.
● विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारित कार्यक्रम प्रसारित केले.
■ विकास :-
● भारताला समृद्ध
बहुभाषिकत्त्वाचा ठेवा लाभलेला आहे.
● भारतामधे असलेल्या
भाषांच्या या वैविध्यामुळे जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचायचे असल्यास त्यांच्या भाषेतून
संवाद साधणे जास्त हितकर. त्यादृष्टीने दूरदर्शनने विविध प्रादेशिक वाहिन्या चालू केलेल्या
आहेत.
● डीडी काश्मिर, डीडी पंजाबी, डीडी
ईशान्य, डीडी गुजराती, डीडी सहयाद्री, डीडी केरलम
या क्षेत्रीय वाहिन्या इतक्या दूरदर्शनच्या प्रादेशिक
वाहिन्या आहेत
●. या वाहिन्या
जरी प्रादेशिक असल्या तरी संपूर्ण देशामधे उपग्रहाद्वारे प्रसारित केल्या जातात त्यामुळे
देशामधे कुठेही बघता येऊ शकतात.
● दुरदर्शन
चा विकास टप्पा टप्प्यात होत गेलेला दिसतो.
■ दूरचित्रवाणीच्या सर्वसाधरण स्वरूपाची माहिती
● कोणत्याही दृश्याकडे
किंवा वस्तूकडे पाहिले असता डोळ्यांच्या साह्याने आपणास जे ज्ञान मिळते त्याची वर्गवारी
पुढीलप्रमाणे करता येते.
(१) दृश्याच्या निरनिराळ्या घटक विभागांतून परावर्तित
झालेल्या प्रकाशाची कमी अगर अधिक तीव्रता आणि त्यामुळे निर्माण होणारी प्रकाश व छाया
यांची एक वैशिष्ट्यपूर्ण रचनाकृती असते.
(२) गतिमान
घटक अंतर्भूत असलेल्या दृश्यांतील काही घटक स्थिर असतात तर काहींना गती असते.
(३) निरनिराळे रंग व त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण
असते.
(४) त्रिमिती अवकाशातील वस्तूंच्या लांबी, रुंदी
इ. परिमाणांविषयीच्या अथवा त्यांच्या एकमेकांपासून (किंवा बघणाऱ्यापासून) असणाऱ्या
अंतराविषयीचे अंदाज.
★ दूरदर्शनचे दैनंदिन कार्य :-
● दूरदर्शनवर सर्व सामान्यांसाठी सोप्या व सध्या शब्दात बातमी
प्रसारित केल्या जातात.
● जनसामान्यना लोकशिक्षण देण्यासाठी
● समाजात राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन गरजा, व समस्यांवर
उपाय सुचविण्यासाठी हे माध्यम काम करते.
● हवामानाचा अंदाज देण्यासाठी
● शासकीय योजना समाजापर्यंत पोहचवयचे काम करते. उदा .सकस आहार, आरोग्य विषयक शासकीय उपाय योजना
इ.
● आरोग्य विषयक रोजचे कार्यक्रम उदा. डेंग्यू आजार
संदर्भात, हिवताप
● देशी, विदेशी बातम्यांचे संकलन
करून बातमीपत्रे प्रक्षेपित करणे.
● देशाचा योज्नाबाध्द सर्वांगीण
विकास कसा होईल, याबद्दलचे विचार व माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे.
● शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे
● देशातील शेतकऱ्यांना कृषिविषयक
नवनवीन शासकीय योजनांबद्दल माहिती देणे, कृषीशिक्षण देणे
● मनोरंजन व माहिती करिता नभोनाट्य,
देशी या विदेशी चित्रपट, चर्चासत्रे, व्याख्याने, संगीताचे बहुविध कार्यक्रम
दाखवण्यात येतात.
★ खाजगी दूरचित्रवाणीचा परिचय
● भारतामध्ये दूरचित्रवाणी प्रसारणाची सुरुवात झाल्यानंतर
मराठी भाषेमध्ये प्रथम इ. स. १९७२ मध्ये मुंबईच्या दूरदर्शन केंद्रामधून ३ तासांचे
मराठी प्रसारण दूरदर्शनने सुरु केले.
● सर्वात प्रथम खाजगी चॅनल हे झी आहे, त्याची सुरुवात
१९९२ मध्ये झाली.
●
■ दूरचित्रवाणीचे कार्य त्याची उपयुक्तता आणि ठळक वैशिष्ट्ये
दूरचित्रवाणीची
उपयुक्तता
● संप्रेषण
टिकविण्यासाठी :-
संप्रेषण हे मानवी जीवनाचा अविभाज्य
घटक आहे. आणि हा घटक
सतत टिकवून ठेवण्यासाठी दृक - श्राव्य माध्यमांची गरज भासते. या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर संप्रेषण नेहमीच चालू
असते.
● प्रबोधन :-
दृक - श्राव्य माध्यमातुन समाज प्रबोधन कार्य केले जाते. एखादी मोठी
समस्या आहे आणि त्याबद्दल काही गैरसमज समाजात पसरलेले असतात. असा वेळी लोक
प्रबोधनाचे कार्य उत्तमप्रकारे ही माध्यमे करू शकतात.
● विचारांचा
प्रचार - प्रसार :
समाजात वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रातील माणसे आहेत, त्यांचा वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आहे. वेळोवेळी ते
आपले विचार व्यक्त करत असतात. त्यांनी असे व्यक्त केलेले विचार समाजाला हितकारक असतात तर
कधी अहितकारकही असतात.दृक - श्राव्य माध्यमातुन त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होतो.
● लोकशिक्षण :-
दृक - श्राव्य माध्यमातुन सामान्यांना लोकशिक्षण देण्याचे कार्य केले जाते. सर्वाना सर्व
गोष्टीचे ज्ञान असते असे नाही. त्यामुळे जनसामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत एखादी गोष्ट
समजून सांगितले जाते. समजा H1N1 या रोगाबाबत जनसामान्य माणसांना काही माहीत नाही. हा रोग कशा
मुळे आणि का होतो? त्याची कारणे कोणती? त्यावेळी प्रसारमाध्यमे व्यवस्थितरित्या त्याची माहिती सांगतात
आणि त्या रोगाबाबत काळजी घेण्याची सूचनाही करतात.
● समस्यांचे
निराकरण :-
आजच्या अवस्थेत समाजाची जडणघडण आहे त्या अवस्थेत उद्या ती असेलच असे नाही. कधी काय
होईल सांगता येत नाही. अचानक कोणते संकट आले तर काय करायचे यामुळे माणसात
भीतीचे वातावरण असते माणूस जितका साहसी असतो तितकाच तो भित्राही असतो. प्रत्येक
वेळेस समाजाची मानसिकता बिघडण्याचे करण्याचे कारण म्हणजे कुठलीतरी समस्या आणि ती
कशी सोडवायची याच्या विवंचनेत समाज असतो. अशावेळेस समाजाची हालचाल नेहमीच्या वाटेने जाण्यासाठी
दृक - श्राव्य माध्यमे जी काही समस्या उद्भवली असेल ती दूर करण्याचा प्रयत्न करतात.
■ दूरचित्रवाणीचे ठळक वैशिष्ट्ये :-
● प्रकाश आणि ध्वनी योजना :-
योग्य प्रकाश
योजना आणि ध्वनीचाही योग्य वापर यांच्या संयोगाने दूरदर्शन आणि त्याच्यावरील सर्व कार्यक्रम
अहोरात्र सुरू असतात. दूरदर्शन हे दृक - श्राव्य माध्यम
असल्यामुळे योग्य प्रकाश योजना केली की कार्यक्रमाची रंगत आणखी वाढते.
● घटना प्रसंगाचे थेट प्रक्षेपण :-
घटना रंग कोणताही असला तरी त्याचे चित्र दूरदर्शन हे प्रत्यक्ष
दाखविते त्यामुळे घडलेल्या घटनेचे सर्व संदर्भ समजतात. प्रत्येक्ष घटना कशी झाली आहे
किंवा ती कशामुळे झाली आहे, किती नुकसान झाले हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते.
● श्रोता
प्रेक्षक भूमिका :-
दूरदर्शन हा श्रोता आणि
प्रेक्षक यांच्या दोन्हीही भूमिका पार पाडायला लावणारे माध्यम
आहे. दूरदर्शनवरचा
कोणताही कार्यक्रम श्रोता प्रेक्षक याच भूमिकेत पहिला जातो.
● कॅमेऱ्याचा वापर :-
कॅमेरा, कॅमेऱ्याचे
स्थान किंवा कॅमेऱ्याची हालचाल यांना विशेष महत्व असते. कोणत्या प्रसंगी कॅमेरा कसा वापरायचा यांचे एक विशिष्ट तंत्र
असते. दुरदृश्य, मध्यदृश्य किंवा
समीपदृश्य तसेच अतिदुरदृश्य किंवा अतिसमीपदृश्याचे चित्रीकरण कॅमेरा करत असतो.
- - - - - -
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
No comments:
Post a Comment