Monday, April 03, 2023

Polity mcq for mpsc | भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग १

 भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग १



प्रश्न १. ______ हे परिशिष्ट पक्षांतर विरोधीकायदा म्हणून ओळखले जाते.

अ) परिशिष्ट 10

ब) परिशिष्ट 8

क) परिशिष्ट 11

ड) परिशिष्ट 12

परिशिष्ट 10 

• परिशिष्ट 8 - घटनेने मान्यता दिलेल्या भाषा. सध्या 22 भाषा आहेत.
• परिशिष्ट 11 - पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. 
• परिशिष्ट 12 - नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत






प्रश्न २ . सध्या राज्यघटनेतील भाग 3 मध्ये सर्व नागरिकांना ____ मूलभूत हक्कांची हमी देण्यात आली आहे.

अ) चार

ब) पाच

क) सहा

ड) सात

सहा 

मूलभूत हक्क

1)समतेचा हक्क(कलम 13-18)
2)स्वातंत्र्याचा हक्क(कलम 19-22) 
3)शोषणाविरोधी हक्क(कलम 23-24)
4)धर्मस्वातंत्र्याचा हक्क (कलम 25-28) 
5)सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क(कलम 29-30) 
6)घटनात्मक संरक्षणाचा हक्क(कलम 32)






प्रश्न ३. _______ हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

अ) उपराष्ट्रपती

ब) राष्ट्रपती

क) विरोधी पक्षनेता

ड) केंद्रीय गृहमंत्री

उपराष्ट्रपती





प्रश्न ४. खालीलपैकी कोणत्या राज्याला 1963 साली भारतातील सोळाव्या राज्याचा दर्जा देण्यात आला ?

अ) हरियाणा

ब) गोवा

क) नागालँड

ड) झारखंड

नागालँड

• गोवा 25 वे राज्य 
• हरियाणा 17 वे राज्य (1966) 
• झारखंड 28 वे राज्य(2000)





प्रश्न ५. लोकसभेच्या सर्वात जास्त जागा कोणत्या राज्यात आहेत.

अ) महाराष्ट्र

ब) गोवा

क) बिहार

ड) उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेश - 80 जागा     बिहार - 40 जागा    गोवा - 2 जागा     महाराष्ट्र - 48 जागा






प्रश्न ६. कायद्याचे समान संरक्षणही संकल्पना ______ च्या राज्यघटनेतून घेतली आहे .

अ) ब्रिटन

ब) रशिया

क) अमेरिका

ड) कॅनडा

अमेरिका 

• ‘कायद्यापुढे समानता’ ही संकल्पना - ब्रिटिश 
• ‘कायद्याचे समान संरक्षण’ ही संकल्पना - अमेरिका





प्रश्न ७. सध्या(२०२३ जानेवारी) भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

अ) 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश

ब) 29 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश

क) 27 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश

ड) 30 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश

28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश





प्रश्न ८. राज्यातील जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?

अ) राष्ट्रपती

ब) विधानसभा अध्यक्ष

क) मुख्यमंत्री

ड) राज्यपाल

राज्यपाल





प्रश्न 9.  विभागीय परिषदांचे अध्यक्ष कोण असतो 

अ) पंतप्रधान

ब) राष्ट्रपती

क) केंद्रीय गृहमंत्री

ड) यापैकी नाही

केंद्रीय गृहमंत्री





प्रश्न 10. देशातील सर्व नागरिकांना समान नागरी कायद्याची हमी कोणत्या कलमानुसार नमूद केली आहे ?

अ) कलम ४४

ब) कलम ४०

क) कलम १४

ड) कलम ४८

कलम ४४

• कलम 13 - कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण 
• कलम 40 - ग्रामपंचायतींचे संघटन 
• कलम 48 - कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन




पुढे>>>>>>>                         

No comments:

Post a Comment