प्रश्न 94. 'झेप', 'झुंज', 'मंत्रावेगळा', 'राऊ', 'शहेनशहा', 'शिकस्त' आणि 'राजेश्री' या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखन करणारे कादंबरीकार कोण ?
अ) नागनाथ संतराम इनामदार
ब) जयंत नारळीकर
क) रावसाहेब रंगराव बोराडे
ड) विश्वास पाटील
- नागनाथ संतराम इनामदार ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळख.
- राऊ कादंबरीचे हिंदीत राऊ स्वामी (प्रकाशक - भारतीय ज्ञानपीठ) असा अनुवाद करण्यात आला आहे.
- झुंज कादंबरीचा हिंदीत प्रतिघात (प्रकाशक - भारतीय ज्ञानपीठ) असा अनुवाद.
- दुसऱ्या बाजीरावाच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी - मंत्रावेगळा
- औरंगजेबाच्या जीवनावरील कादंबरी - शहेनशहा
- सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या जीवनावरील कादंबरी - शिकस्त
- थोरल्या बाजीरावांवरील कादंबरी - राऊ
- छत्रपती शिवाजी महाराजांवरील कादंबरी - राजेश्री
- 1997 मध्ये 70 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अहिल्यानगर(अहमदनगर) येथील अध्यक्ष.
- तीन आत्मकथने -
२. चांदराती रंगल्या मध्ये वाग्मयीन आठवणी.
३. वाळल्या फुला मध्ये जीवनातील स्वानुभाव
No comments:
Post a Comment