Wednesday, December 25, 2024

SET/NET Marathi Paper 35

  

SET/NET Marathi Paper 35

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. भाषिक चिन्हाचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही ? (SET 2024)

अ) उच्चार आणि प्रतित होणारा अर्थ यांचा संयोग

ब) दोन अंगांची अतूटता

क) सौंदर्यपूर्णता

ड) भाषाविशिष्टता

  • क) सौंदर्यपूर्णता







  • प्रश्न 2. शब्दांना ध्वनी वा संगीताची दृश्यासह जोड देऊन मुख्यत्वे काय साध्य होते (SET 2024)

    अ) मनोरंजन व लोकानुरंजन

    ब) नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थसूचन

    क) नावीन्यपूर्णता

    ड) संवेदनानुभवाची समृद्धी

  • ब) नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थसूचन







  • प्रश्न 3. सर्वसाधारण भाषाविष्कारास व्याकरणिक नियमांचे बंधन असते, मात्र साहित्यातील भाषाविष्कारावरही वेगळ्या प्रकारची अधिक बंधने असतातच (SET 2024)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर







  • प्रश्न 4. मराठी व्याकरणकारांनी शब्दांच्या आठ जाती मानल्या, कारण :     (SET 2024)

    अ) संस्कृत व्याकरणात आठ वर्ग मानले होते

    ब) इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता

    क) आठ विभक्तींसी संबंध जोडला गेला

    ड) आठ हि संख्या महत्वाची वाटली

  • ब) इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता






  • प्रश्न 5. विभक्ती प्रत्ययांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या गटात करावा, अशी सूचना अभ्यासक करतात (SET 2024)

    अ) शब्दयोगी

    ब) आख्यात

    क) केवलप्रयोगी

    ड) उभयान्वयी

  • अ) शब्दयोगी






  • प्रश्न 6. पुढीलपैकी कोणते अक्षरगणवृत्त नाही (SET 2024)

    अ) मंदारमाला

    ब) उपेंद्रवज्रा

    क) पादाकुलक

    ड) भुजंगप्रयात

  • क) पादाकुलक







  • प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या भाषा एका भाषाकुळातील आहेत (SET 2024)

    अ) मराठी, गुजराती, सिंधी

    ब) मराठी, कन्नड, तेलगू

    क) उडिया, कन्नड, तमीळ 

    ड) गुजराती, कोकणी, कन्नड

  • अ) मराठी, गुजराती, सिंधी






  • प्रश्न 8. कार्यकर रुपिमांचा गट पुढीलपैकी कोणता (SET 2024)

    अ) माणूस, गाय, की

    ब) भाषा, विचार, कृती

    क) दया, सुंदर, पणा

    ड) त, ला, ई

  • ड) त, ला, ई







  • प्रश्न 9. भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही (SET 2024)

    अ) व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी 

    ब) समाजातील प्रतिष्ठेच्या कल्पना

    क) व्यक्तीचे आनुवंशिक गुणधर्म

    ड) व्यक्तीची व्यावसायिक पार्श्वभूमी

  • क) व्यक्तीचे आनुवंशिक गुणधर्म







  • प्रश्न 10. बोलींचे नमुने गोळा करताना पुढीलपैकी कोणती गोष्ट उपकारक ठरत नाही (SET 2024)

    अ) निवेदकाचे प्रौढत्व

    ब) निवेदकांची मोजकी संख्या

    क) प्रशिक्षित क्षेत्रीय संशोधक

    ड) प्रश्नावली व मूलभूत शब्दसंग्रहाचा विचार

  • ब) निवेदकांची मोजकी संख्या







  • प्रश्न 11. 'दलित नाटक भडक आहे हे मत मला मान्य नाही. ज्या अर्थी दलित नाटक भडक आहे........ त्याच अर्थाने मराठीतील अर्ध्याहून अधिक नाटके भडक आहेत', हे विधान कोणाचे आहे (SET 2024)

    अ) दत्ता भगत

    ब) रा. ग. जाधव

    क) प्रेमानंद गज्वी

    ड) भि. शि. शिंदे

  • अ) दत्ता भगत







  • प्रश्न 12. 'सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण' हि पुस्तिका कोणी लिहिली आहे (SET 2024)

    अ) भालचंद्र नेमाडे

    ब) रंगनाथ पठारे

    क) मकरंद साठे

    ड) गो. पु. देशपांडे

  • क) मकरंद साठे







  • प्रश्न 13. 'दैवतकथेत ऐतिहासिक सत्य लपलेले असते.' हि भूमिका कोणत्या अभ्यास संप्रदायाची आहे ? (SET 2023)

    अ) निसर्गरूपवादी

    ब) भ्रांतकल्पनावादी

    क) भाषाशास्त्रीय

    ड) संप्रसारणवादी

  • ब) भ्रांतकल्पनावादी






  • प्रश्न 14. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावा :        (SET 2023)

    (a). फोर आर्केटाईप्स             1. रॉबर्ट रेडफिल्ड

    (b). रिकरंट थीम्स इन             2. रॉबर्ट रेडफिल्ड
         मिथ अँड मिथमेकिंग

    (c). पिझन्ट सोसायटी              3. के. एम. चिडविक
          अँड कल्चर

    (d). द ग्रोथ ऑफ लिटरेचर       4. सी. जी.  युंग 

                                                  5. हेनरि मरे


    अ) (a) - 5, (b) - 2, (c) - 2, (d) - 4

    ब) (a) - 2, (b) - 4, (c) - 3, (d) - 5

    क) (a) - 4, (b) - 5, (c) - 2, (d) - 3

    ड) (a) - 3, (b) - 3, (c) - 1, (d) - 1

  • क) (a) - 4, (b) - 5, (c) - 2, (d) - 3





  • प्रश्न 15. "दलित साहित्याचा प्रश्न हा या समाजाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहे." हे विधान कोणाचे आहे ? (SET 2023)

    अ) राजा ढाले

    ब) नामदेव ढसाळ

    क) केशव मेश्राम

    ड) रा. ग. जाधव

  • ड) रा. ग. जाधव





  • प्रश्न 16. "बोलीच्या वापरातूनच अनुभव अधिक परिणाम कारकतेने प्रकट होऊ शकतो म्हणून ग्रामीण लेखकांनी विविध बोलींचा अभ्यास करणे गरजेचे आहे."  (SET 2023)

    अ) पूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्ण विधान चूक

    क) फक्त पूर्वार्ध बरोबर

    ड) फक्त उत्तरार्ध बरोबर

  • क) फक्त पूर्वार्ध बरोबर





  • प्रश्न 17. 'कांडी' ही कथा कोणाची आहे ? (SET 2023)

    अ) वासुदेव मुलाटे

    ब) भास्कर चंदनशिव

    क) रा. रं. बोराडे

    ड) उद्धव शेळके

  • क) रा. रं. बोराडे





  • प्रश्न 18. वाङ्मयेतिहास लेखनाविषयीचा कोणता दृष्टिकोन विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रचलित झालेला दिसत नाही ? (SET 2023)

    अ) लेखकानुसारी

    ब) कालखंडानुसारी

    क) वाङमयप्रकारानुसारी

    ड) वाचकप्रतिसादानुसारी

  • ड) वाचकप्रतिसादानुसारी





  • प्रश्न 19. माहिती तंत्रज्ञानामुळे वक्ता आणि श्रोता यांच्यातील स्थळाचेच नव्हे, तर काळाचेही अंतर मिटले आहे ? (SET 2019)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    ड) संपूर्ण विधान चूक

  • अ) संपूर्ण विधान बरोबर





  • प्रश्न 20. बोहाडा हे विधिनाट्य आहे, मात्र त्यात देवातावतरण, देवतासंचार, संचारी नृत्यनाट्य नसते ? (SET 2019)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

    ड) संपूर्ण विधान चूक

  • ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     




    ugc net marathi | set exam marathi previous year papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET Marathi Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net marathi notes | set exam result | marathi set exam syllabus

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    No comments:

    Post a Comment